हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:35 AM2018-02-08T03:35:21+5:302018-02-08T03:35:30+5:30

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले.

Maharashtra tops Haryana | हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान

हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले. बुधवारी महाराष्ट्र संघ २४ सुवर्ण, २५ रौप्य व ३१ कास्यपदकांसह एकूण ८० पदके जिंकून प्रथम क्रमांकावर होते.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुला-मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा ७ मिनिटे राखून पराभव केला. पहिल्या सत्रात १०-४ गुणांनी आघाडी घेतली. नंतर केरळ संघाने ६ गुण संपादन करून बरोबरी साधली. पण शेवटी आक्रमण करणा-या महाराष्ट्राने केरळचा ७ मिनिटे राखून पराभव करत विजेतेपद जिंकले. महाराष्ट्राकडून संरक्षण करताना निहार दुबळेने (२.२५ व १.४५ से.), आदर्श मोहिते (२.२७ से.), संदेश जाधव (२.१३ से.), फैजलखान पठाण (२.०७ से.), धीरज साळुंखे (१.४९ से.) तर आक्रमणात धीरज साळुंखे व संदेश जाधवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुलींच्या अंतिम सामन्यात प्रतीक्षा खुरंगे (३. ०३ से. व ३.०० से.), रेश्मा राठोड (३.१५ से. व ४ मिनिट), प्राची जेटनुरे (२.१० से.), रुतिका मगदूम (२ गडी बाद केले) दीक्षा सनसूरकर (३ गडी) यांच्या जोरावर महाराष्टÑाने गुजरातचा १६-१० गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. या संघांना प्रशांत पवार, राजू साप्ते, अजय पवार, हेमंत खेडेकर व किशोर बोंडे यांनी मार्गदर्शन केले.
वेटलिफ्टिंगमध्ये ७७ किलो मुलांच्या गटात अचिंता शिऊलीने १३४ कि. स्नॅच, क्लीन अ‍ॅºड जर्कमध्ये १५८ कि. असे एकूण २९२ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर कब्जा केला. प्रीतम चव्हाणने (१०० कि. स्नॅच, १३१ कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क) रौप्यपदक संपादन केले. ९४ कि. गटात तेजस लोखंडेला रौप्यपदकावर (१०३ कि. स्नॅच, १२८ कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क असे एकूण २३१ कि.) समाधान मानावे लागले. मुलींच्या ६९ किलो गटात श्रेया गणमुखीने कांस्यपदक (५८ कि. स्नॅच, ७० कि. क्लीन अ‍ॅण्ड जर्क एकूण १२८ कि.) जिंकले. (वृत्तसंस्था)
>जिम्नॅस्टिक्समध्ये मुलांच्या गटात महाराष्टÑाच्या महेश गाढवेने पॉमेल हॉर्स प्रकारात ११ गुण संपादन करून सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. रोमन रिंग प्रकारात किशोर फडणीसला १०.७० गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या गटात अनईव्हन बार प्रकारात पूर्वा किरवे (८.७० गुण) आणि सिद्धी हट्टेकर (८.४० गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
व्होल्ट प्रकारात ऐश्वर्या बेलदरने ११.७०० गुण संपादन करून कांस्यपदक जिंकले. ºिहदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये प्रियांका आचार्यने ३९.२५ गुण सांपदन करून कांस्यपदक आपल्या नावावर केले.

Web Title: Maharashtra tops Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा