महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 09:45 PM2020-09-06T21:45:11+5:302020-09-06T21:46:03+5:30
महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
महाराष्ट्राचा कुस्तीपटूराहुल आवारे याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या राहुलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रीय शिबिरासाठी तो सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात दाखल झाला आणि तेथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. विनेश फोगाट, दीपक पुनिया, नवीन आणि कृष्णन यांच्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला राहुल हा पाचवा कुस्तीपटू आहे.
राहुलनं नॉन ऑलिम्पिक 61 किलो वजनी गटात गतवर्षी कांस्यपद जिंकले होते. ''नियमानुसार आता राहुलला आता साईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत,''असे क्रीडा प्राधिकरणानं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. त्यात पुढे असं म्हटलं आहे की,''साइ केंद्रात आल्यापासून राहुल क्वारंटाईन होता आणि तो कोणाच्या संपर्कात आलेला नाही.''
या संदर्भात राहुलशी संपर्क साधला असता त्यानं वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, दीपक पुनियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून तो घरी आयसोलेट झाला आहे. विनेशनं कोरोनावर मात केली आणि तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
IPL 2020 : मुंबई इंडियन्स कोणाशी व कधी भिडणार, जाणून घ्या रोहित शर्माच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक