महाराष्ट्राच्या विकास यादवला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:12 AM2018-02-02T01:12:30+5:302018-02-02T01:12:47+5:30
महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. भूपेंदरने ६.९९ मीटर व ७.०४ मीटर लांब उडी मारत सुवर्णपदक पटकावले. जलद धावपटू एंकी सोजानने लांब उडीत सुवर्ण, तर २०० मीटर धावणेत रौप्यपदक मिळवले.
सॅँड्राने लांब उडी व तिहेरी उडीत रौप्यपदक पटकावले. हरयाणाच्या यशवीरला रौप्यपदक मिळाले. अर्पित यादवने भालाफेकमध्ये कांस्यपदक मिळवले. पोलवॉल्टमध्ये तमिळनाडूच्या सत्याने प्रथम क्रमांक पटकावला.
‘खेलो इंडिया’चे कौतुक
पी. टी. उषा, बायचुंग भुतिया व विजेंदर सिंग या दिग्गज खेळाडूंनी सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ‘मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. खेलो इंडियामुळे भारतीय खेळांच्या पायाभूत संरचनेपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे,’ असे मत माजी कर्णधार बायचुंग भुतियाने व्यक्त केले.