चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाला कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 04:54 PM2018-03-06T16:54:11+5:302018-03-06T16:54:11+5:30
छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला.
मुंबई : छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी नुकताच विजेत्या संघाचा सत्कार केला.
रायगड येथे 15 ते 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित या स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या महावितरणच्या संघात कर्णधार राजश्री पवार, प्रियंका उगले, तेजश्री गायकवाड (सीपीएफ विभाग, धारावी), पुजा पाटील, अश्विनी शेवाळे (भांडूप), संगीता देशमुख, सायली कचरे (पुणे), हर्षला मोरे (कल्याण) यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून किरण देवडिगा व व्यवस्थापक म्हणून स्मिता साळुंखे (मुख्यालय, मुंबई), यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
विजेत्या संघाच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांच्यासह संचालक (वाणिज्य) श्री. सतिश चव्हाण, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी) श्री संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी -I श्री पी.एस. पाटील व सहमुख्य जनसंपर्क अधिकारी -II श्री अनिल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.