माहेलाला विजयाने निरोप !

By admin | Published: August 19, 2014 12:35 AM2014-08-19T00:35:47+5:302014-08-19T00:35:47+5:30

o्रीलंकेने दुस:या कसोटीत पाकिस्तानचा 1क्5 धावांनी धुव्वा उडवून माजी कर्णधार माहेला जयवर्धने याला परफेक्ट सॅन्डॉप दिला.

Mahela wishes to win! | माहेलाला विजयाने निरोप !

माहेलाला विजयाने निरोप !

Next
कोलंबो : o्रीलंकेने दुस:या कसोटीत पाकिस्तानचा 1क्5 धावांनी धुव्वा उडवून माजी कर्णधार माहेला जयवर्धने याला परफेक्ट सॅन्डॉप दिला. 
 रंगना हेराथच्या जादुई फिरकीच्या बळावर  लंकेने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 271 धावांचा पाठलाग करताना पाकने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 127 धावांत 7 फलंदाज गमावले. 
श्रीलंकेने पाचव्या दिवशी पहिल्या तासाभरात पाकचा डाव गुंडाळला. पाकचा दुसरा डाव अवघ्या 165 धावांत आटोपला. त्यामुळे श्रीलंकेने 105 धावांनी विजय मिळवला. 
पहिल्या डावात पाकिस्तानच्या 9 फलंदाजांना तंबूत धाडणा:या हेराथने दुस:या डावातही 57 धावांत 5 गडी बाद केले. तो सामनावीर आणि मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला. हेराथने या सामन्याद्वारे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 14 बळी घेतले.
 पाकिस्तानकडून सर्फराज अहमदने 89 चेंडूंत 2 चौकारांसह 55, वहाब रियाजने 17 धावा 
केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव 
52.1 षटकांत 165 धावांत 
आटोपला. श्रीलंकेकडून हेराथने 22.1 षटकांत 57 धावांत 5 गडी बाद केले. धम्मिका प्रसादने  2, तर  चनाका वेलेगेदराने आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
 
श्रीलंका : पहिला डाव 320 आणि दुसरा डाव 282. पाकिस्तान पहिला डाव 332. दुसरा डाव : 52.1 षटकांत सर्वबाद 165 धावा (अहमद 55, असद रफिक 32. हेराथ 5/57, प्रसाद 2/29)

 

Web Title: Mahela wishes to win!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.