महेंद्रसिंह धोनीने तोडला सचिनचा षटकारांचा विक्रम

By admin | Published: October 24, 2016 04:24 AM2016-10-24T04:24:30+5:302016-10-24T04:24:30+5:30

जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतीय वन-डेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडला

Mahendra Singh Dhoni breaks Sachin's record of sixes | महेंद्रसिंह धोनीने तोडला सचिनचा षटकारांचा विक्रम

महेंद्रसिंह धोनीने तोडला सचिनचा षटकारांचा विक्रम

Next

मोहाली : जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतीय वन-डेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडला. धोनीने रविवारी मोहाली येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला तिसरा षटकार ठोकून ही विक्रमी कामगिरी केली.
सचिनने ४६३ सामन्यांमध्ये १९५ षटकार मारले होते. धोनीने २८१ सामन्यांत १९६ षटकार मारून ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (३५१), न्यूझीलंडचा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (२७०), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (२३८), ब्रँडन मॅक्युलम (२००) धोनीच्या पुढे आहेत. (वृत्तसंस्था)

धोनीने गाठला नऊ हजार धावांचा पल्ला
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा, तर जगातील १७ वा फलंदाज ठरला. विश्वकपविजेता कर्णधार धोनीने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात डावखुरा फिरकीपटू मिशेल सँटेनरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत हा पल्ला गाठला. धोनीने नऊ हजार धावांचा पल्ला गाठल्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या विशाल स्क्रीनवर भारतीय कर्णधाराचे अभिनंदन करण्यात आले.

धोनीचा यष्टिचितचा विश्वविक्रम
जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये गणला जाणारा आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येभारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांमध्ये १५१ फलंदाजांना यष्टिचित करण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला.
धोनीने येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे लढतीत रविवारी लेगस्पिनर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलर आणि ल्यूक राँची यांना यष्टिचित करीत हा पराक्रम केला. धोनीने कसोटी, वन-डे आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १५१ फलंदाजांना यष्टिचित करण्याची कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने १३९ फलंदाजांना यष्टिचित करण्याची कामगिरी केली.
विश्वकपविजेता कर्णधार धोनीने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामन्यांत ३८ स्टंपिंग, २८१ वन-डेमध्ये ९१ स्टंपिंग आणि ७३ टी-२० सामन्यांत २२ स्टंपिंग केलेल्या आहेत. तिन्ही प्रकारांत सर्वाधिक बळी घेण्यामध्ये धोनी ७१२ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने कारकिर्दीत ५६१ झेल टिपले असून १५१ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर धोनीच्या तुलनेत आघाडीवर आहेत. गिलख्रिस्टने ३९६ सामन्यांत ९०५ बळी घेतले आहेत.
असून बाऊचरने ४६७ सामन्यांत ९९८ बळी घेतले आहेत.
बाऊचरने ९६ फलंदाजांना यष्टिचित केले, तर गिलख्रिस्टने ९२ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.

Web Title: Mahendra Singh Dhoni breaks Sachin's record of sixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.