महेंद्रसिंह धोनीने नाकारला सलोखा
By admin | Published: July 17, 2014 12:46 AM2014-07-17T00:46:11+5:302014-07-17T00:46:11+5:30
जडेजा - अॅँडरसन यांच्यातील वादाने आठवडा ढवळून निघाला असतानाच इंग्लडने मात्र पत्रकारांना इमेल पाठवून ते आपला खेळाडू अॅँडरसनच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
अजय नायडू, लंडन
जडेजा - अॅँडरसन यांच्यातील वादाने आठवडा ढवळून निघाला असतानाच इंग्लडने मात्र पत्रकारांना इमेल पाठवून ते आपला खेळाडू अॅँडरसनच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी)ने अॅँडरसनला लेव्हल ३ च्या गुन्हाबद्दल शिक्षा होऊ शकते असे स्पष्ट केले आहे.
या बातमीने सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. कारण भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लड हे क्रिकेटमधील ‘बिग थ्री’ म्हणून ओळखले जातात. या तिनही मंडळाकडे क्रिकेटची सत्ता एकवटली असताना या वादामुळे हे संबध बिघडू नयेत याची दक्षता घेण्यात येत आहे. मात्र कर्णधार धोनीने या वादात पडत सलोख्याचे प्रयत्न धुुडकावले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सलोख्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र धोनी आपल्या मतावर ठाम आहे.
नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. गुरुवारी उपहाराला मैदानावरुन परत येत असताना जडेजाला अॅण्डरसनने शिवीगाळ केली तसेच धक्का दिला. मात्र परत पॅव्हेलियनमध्ये येत असताना अण्डरसने जडेजाला धक्का दिल्यामुळे परिस्थिती चिघळली.यावेळी जडेजासमवेत धोनीही तेथे होता. त्यामुळे त्याने अधिकृत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. धोनी हा सभ्य खेळाडू म्हणून ओळखला जातो. अॅण्डरसने आपल्या मर्यादा ओलंडल्या असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. अशा प्रकारच्या वर्तणूकीला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये असे भारतीय कर्णधाराचे म्हणने आहे.
भारताने या प्रकारची अधिकृत तक्रार दाखल केली असून इंग्लडनेही आपल्या खेळाडूची पाठराखण करण्यास प्रारंभ केला आहे. अॅण्डरसने जडेजाच्या कृतीचा फक्त प्रतिकार केला असे त्यांचे म्हणणे आहे. भारताचे व्यवस्थापक सुनील देव म्हणाले,‘ हा खरंच गंभीर प्रकार आहे. तुम्ही कोणाला धक्का मारु शकत नाही. यामुळेच मी सामन्याधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.’