अफगाणिस्तान मुख्य फेरीत

By admin | Published: March 13, 2016 04:22 AM2016-03-13T04:22:42+5:302016-03-13T04:22:42+5:30

मोहंमद नबीच्या अर्धशतकापाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वर्चस्व गाजविणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या ‘ब’ गटाच्या निर्णायक पात्रता लढतीत

In the main round of Afghanistan | अफगाणिस्तान मुख्य फेरीत

अफगाणिस्तान मुख्य फेरीत

Next

किशोर बागडे, नागपूर
मोहंमद नबीच्या अर्धशतकापाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वर्चस्व गाजविणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या ‘ब’ गटाच्या निर्णायक पात्रता लढतीत शनिवारी झिम्बाब्वेचा ५९ धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच दिमाखात मुख्य फेरी गाठली.
अफगाण संघ मुख्य फेरीत ग्रुप १ मध्ये इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंंडीज यांच्यासोबत खेळणार आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर झालेल्या या लढतीत अफगाण संघाने झिम्बाब्वेवर चौफेर वर्चस्व गाजविले. मोहंमद नबी ‘सामनावीर’ ठरला.
अफगाणिस्तानच्या ६ बाद १८६ धावांना उत्तर देणारा झिम्बाब्वे संघ १९.४ षटकांत १२७ धावांत बाद झाला. आठव्या स्थानावर आलेल्या पेनयांगाराच्या ७ चेंडूंतील सर्वाधिक नाबाद १७ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. सिकंदर रझाने १५, सीन विल्यम्सने १३, सिबांडाने १३ आणि हॅमिल्टन मस्कद्जा याने ११ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशीद खान याने ४ षटकांत ११ धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले. हमीद हसन याने दोन तसेच दौलत झदरान, समीउल्लाह शेनवारी, मोहंमद नबी आणि असगर स्तानिकजई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, मधल्या फळीचा आधारस्तंभ असलेल्या मोहंमद नबीने ४ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याने समीउल्ला शेनवारीसोबत पाचव्या गड्यासाठी ६४ चेंडूत ९८ धावांची भागीदारी करू धावसंख्येला आकार दिल्याने २० षटकांत ६ बाद १८६ पर्यंत मजल मारता आली. शेनवारीने ४ चौकार व एका षटकारासह ४३, तर सलामीवीर शहजाद याने ७ चौकारांसह ४० धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने दिलेल्या अवांतर २५ धावांत १७ वाईड चेंडूंचा समावेश होता. मध्यमगती गोलंदाज पेनयांगराने ३ गडी बाद केले. शहजादने सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी करून तेंदई चतारा याला सलग ३ चौकार ठोकले.
शहजादनेच तिरीपानो याला चौथ्या षटकांत पुन्हा सलग ३ चौकार लगावले. आपल्या वादळी खेळीत त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. अखेर पाचव्या षटकात सीन विल्यम्सने शहजादला कर्णधार हॅमिल्टन मस्कद्झाकरवी झेलबाद केले आणि झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून
दिले. त्यानंतर अफगाण संघाचा कर्णधार असगर स्तॅनिकझाई हा मैदानावर आला; मात्र प्यानगारा
याने त्याला झटपट तंबूत परतवले. सिंकदर रझा याने त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर आलेल्या गुुलाबदीन नबीलाही वैयक्तिक ७ धावसंख्येवर प्यानगारानेच त्रिफळाचीत केले. दुसरा सलामीवीर नूर अली झरदानही त्यानंतर लगेच बाद झाला. १ बाद ४९ धावसंख्येवरून अफगाण संघ ४ बाद ६३ वर पोहोचला.संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १८६ धावा (मोहंमद नबी ५२, समीउल्लाह शेनवारी ४३, मोहंमद शहजाद ४०, नूर अली जरदान १०, पेनयांगारा ३२/३, सीन विल्यम्स २५/१, तिरिपानो ४१/१)
झिम्बाब्वे : १९.४ षटकांत सर्व बाद १२७ धावा (पेनयांगारा १७, सिकंदर रझा १५, सीन विल्यम्स १३, सिबांडा १३, मस्कद्जा ११, मुतुम्बामी १०, एल्टन चिगंबुरा १०, राशीद खान ११/३, हमीद हसन ११/२, दौलत जदरान, समीउल्लाह शेनवारी, मोहंमद नबी, असगर स्तानिकजई प्रत्येकी एक बळी).

>> हा अफगाणिस्तानच्या जनतेसाठी मोठा विजय आहे, या शब्दांत झिम्बाब्वेवरील विजयाचे वर्णन अफगाणिस्तानचा कर्णधार असद स्तानिकजई याने टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील महत्त्वाचा विजय देशवासियांना समर्पित केला.
व्हीसीएवर विजयानंतर आनंदी झालेला स्तानिकजई पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘आम्ही याआधी २०१० आणि २०१२ मध्ये टी-२० विश्वचषकात खेळलो. त्या वेळी थेट प्रवेश मिळाला होता. यंदा पहिल्यांदा पात्रता फेरीचा अडथळा दूर करीत अफगाणिस्तानने सलग तीन विजयांसह मुख्य फेरीत धडक दिली आहे.’
आशिया चषकात चांगला खेळ करूनही पात्रता फेरी गाठू शकलो नव्हतो. त्यामुळे येथे चांगला खेळ करण्याचे आव्हान होते. देशातील जनतेला आनंद देणारा हा विजय आहे. मैदानावरही आमच्या चाहत्यांनी भक्कम पाठिंबा दर्शविल्याने आमच्या उत्साहात भर पडू शकली. विश्वचषकाच्या मुख्य फेरीत खेळणे ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. सलामीवीर मोहम्मद शहजाद
व मधल्या फळीतील फलंदाज गुलबदिन नबी यांच्या प्रयत्नांचे कर्णधाराने तोंडभरून कौतुक केले.

 

Web Title: In the main round of Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.