पुढील सात-आठ वर्षे हाच मुख्य संघ असेल
By admin | Published: January 20, 2015 11:55 PM2015-01-20T23:55:01+5:302015-01-20T23:55:01+5:30
भारतीय संघातील सध्याचे खेळाडू पुढील सात-आठ वर्षे संघाचा मुख्य आधार असतील, अशी भविष्यवाणी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी याने केली होती,
नवी दिल्ली : भारतीय संघातील सध्याचे खेळाडू पुढील सात-आठ वर्षे संघाचा मुख्य आधार असतील, अशी भविष्यवाणी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी याने केली होती, अशी माहिती भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने दिली.
रणजी करंडक स्पर्धेसाठी सराव करताना सहा म्हणाला, ‘‘निवृत्तीनंतर धोनीने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित केले आणि तो म्हणाला, की हा मुख्य कसोटी संघ आहे व पुढील सात-आठ वर्षांपर्यंत हाच मुख्य संघ राहील. सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि संधीचा फायदा घ्यायला हवा.’’ भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री आणि मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासह संघातील इतर खेळाडूंनी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे साहा म्हणाला.
धोनीच्या कसोटी निवृत्तीनंतर रवी शास्त्री आणि डंकन फ्लेचर यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता. सिडनी आणि अॅडिलेड कसोटीत त्यांनी प्रोत्साहन दिले.
धोनीच्या निवृत्तीनंतर कमी दबाव आहे का, या प्रश्नावर साहा म्हणाला, ‘‘मी असा कधी विचार केला नाही. सर्वांसाठी संधी आहे आणि चांगली कामगिरी करणाऱ्याला संधी मिळेल. माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास धोनी खेळत असताना मी कठोर परिश्रम करीत होतो आणि त्यात आजही बदल झालेला नाही.