लंकेवर वर्चस्व राखण्याचा द. आफ्रिकेचा प्रयत्न

By admin | Published: June 3, 2017 12:56 AM2017-06-03T00:56:33+5:302017-06-03T00:56:33+5:30

बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला जाणारा द. आफ्रिका संघ ओव्हलवर श्रीलंकेविरुद्ध

To maintain dominance over Lanka Africa's efforts | लंकेवर वर्चस्व राखण्याचा द. आफ्रिकेचा प्रयत्न

लंकेवर वर्चस्व राखण्याचा द. आफ्रिकेचा प्रयत्न

Next

लंडन : बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला जाणारा द. आफ्रिका संघ ओव्हलवर श्रीलंकेविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना आज, शनिवारी खेळणार आहे. आफ्रिकेने लंकेवर नेहमीच सरशी साधली असल्याने या सामन्यात वर्चस्व कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
आफ्रिकेने लंकेविरुद्ध खेळलेले सर्व सातही वन-डे जिंकले. त्यात फेब्रुवारीत झालेल्या पाच सामन्यांचा देखील समावेश आहे. २०१५च्या विश्वचषकात सिडनीत झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आफ्रिकेने लंकेला १३३ धावांत गुंडाळून नऊ गड्यांनी शानदार विजय मिळविला होता. वन डे मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या आफ्रिकेची दुसरी बाजू अशी की आयसीसी स्पर्धेत त्यांचे रेकॉर्ड फारसे चांगले नाही. ‘चोकर्स’चा डाग पुसून काढण्यास आफ्रिकेचे खेळाडू आसुसले आहेत. द. आफ्रिकेने १९९८ मध्ये पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली पण हा अपवाद वगळात त्यांना एकही आयसीसी स्पर्धा अद्याप जिंकता आली नाही.
आफ्रिकेचा संघ संतुलित आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील फलंदाज डिव्हिलियर्स आणि नंबर वन गोलंदाज कासिगो रबाडा हे दोघेही त्यांच्या संघात आहेत. अनुभवी हाशिम अमला, डुप्लेसिस, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, व्हेन पार्नेल हे सर्व हुकमी खेळाडू आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये या संघाचे चार फलंदाज आणि दोन गोलंदाज पहिल्या दहा जणांत आहेत.

Web Title: To maintain dominance over Lanka Africa's efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.