Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 05:24 PM2021-11-13T17:24:14+5:302021-11-13T17:24:51+5:30

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. आज राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ खेळाडूंना खेलरत्न व ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 given to 12 sportspersons including Neeraj Chopra, Mithali Raj, Sunil Chetri from President Ram Nath Kovind | Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

Next

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १२५ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धेतील  ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर हे भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. यासह अनेक खेळाडूंनी भारताला ऐतिहासिक क्षण दाखवले. त्यामुळेच यंदा नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.  

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीत सिंह यांनाही  खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


 पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमीत अंतिल यांनाही आज गौरविण्यात आले.   

पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत,  महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री हेही या पुरस्काराचे मानकरी ठरले. फुटबॉल स्टार आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्री याचा होणारा सन्मान ऐतिहासिक ठरला आहे. आता पर्यंत कधीही खेलरत्न पुरस्कारासाठी फुटबॉलपटूची शिफारस झालेली नाही. त्यामुळे छेत्रीचा होणारा गौरव भारतीय फुटबॉलसाठे अत्यंत अभिमानास्पद आहे. मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. 

खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू - नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी.आर.श्रीजेश (हॉकी), लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमीत अंतिल (भालाफेक), अवनी लेखरा (नेमबाजी), कृष्णा नागर (बॅडमिंटन), एम नरवाल (नेमबाजी), मनप्रीत सिंग ( हॉकी) 

क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि  ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. 

Web Title: Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 given to 12 sportspersons including Neeraj Chopra, Mithali Raj, Sunil Chetri from President Ram Nath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.