हॅट्ट्रिक साधणार...
By admin | Published: December 31, 2015 01:52 AM2015-12-31T01:52:14+5:302015-12-31T01:52:14+5:30
जागतिक टेनिस पुरुष एकेरीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टेनिस्लास वावरिंका आगामी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी सज्ज असून या स्पर्धेत विजेतेपद पटकावून शानदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा निर्धार त्याने केला आहे.
चेन्नई : जागतिक टेनिस पुरुष एकेरीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टेनिस्लास वावरिंका आगामी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी सज्ज असून या स्पर्धेत विजेतेपद पटकावून शानदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा निर्धार त्याने केला आहे.
स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने या स्पर्धेच्या गेल्या दोन सत्रांत वर्चस्व राखले आहे. वावरिंका म्हणाला, की चेन्नईला येणे मला खूप आवडतं. मोसमाची सुरुवात या स्पर्धेने होणार असल्याने ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. येथील टेनिसप्रेमी जबरदस्त आहेत आणि स्टेडियममधील वातावरणही खूप चांगले आहे. या स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धारानेच खेळणार असून प्रत्येक सामन्यानुसार मी माझी रणनीती आखेल.
चेन्नई ओपन ४ ते ५ जानेवारीदरम्यान रंगणार असून वावरिंकासह जगभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. या स्पर्धेत मुख्य आकर्षण असेल तो वावरिंका. त्याने दोन ग्रँडस्लॅमसह एकूण ११ विजेतेपद जिंकली आहेत. वावरिंका म्हणाला, ‘२०१५ वर्षे माझ्यासाठी चांगले ठरले व माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.
यंदाचे फ्रेंच ओपन माझे सर्वोत्तम जेतेपद ठरले. या वेळी मी अव्वल नोव्हाक जोकोविचला नमवण्यात यशस्वी ठरलो. त्याच्याविरुद्ध केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे कारकिर्दीत दोन ग्रँडस्लॅम पटकावताना जगातील दोन अव्वल खेळाडूंना नमवल्याचा आनंद आहे.
- स्टेनिस्लास वावरिंका