मल्लांचा सराव मैदानातच!
By admin | Published: November 25, 2014 01:08 AM2014-11-25T01:08:45+5:302014-11-25T01:08:45+5:30
गोल्फ कोर्सपासून क्रिकेटर्पयत सर्व खेळांसाठी मैदान उपलब्ध करून देणा:या सिडको व महापालिकेस कुस्तीचा विसर पडला आहे.
Next
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
गोल्फ कोर्सपासून क्रिकेटर्पयत सर्व खेळांसाठी मैदान उपलब्ध करून देणा:या सिडको व महापालिकेस कुस्तीचा विसर पडला आहे. शहरात एकही आखाडा नसल्यामुळे खेळाडूंना ट्रक टर्मिनलजवळ उघडय़ावर सराव करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने खेळाडूंमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
नवी मुंबई सुनियोजित शहर असल्याचा डंका पिटला जातो. शहरात प्रत्येक नोडमध्ये नागरिकांसाठी मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. सद्य:स्थितीमध्ये फुटबॉलसाठी फादर अॅग्नेल, क्रिकेटसाठी डॉ. डी.वाय. पाटील ही सुसज्ज मैदाने आहेत. खारघरमध्ये भव्य गोल्फ कोर्स उभारण्यात आला आहे. जलतरणसह इतर खेळांसाठीही पुरेशा सुविधा आहेत. परंतु महाराष्ट्राच्या मातीशी नाते सांगणा:या कुस्तीसाठी मात्र एकही अत्याधुनिक आखाडा शहरात नाही. 1क् वर्षापूर्वी शहरात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळी सर्वच नेत्यांनी ऑलिम्पिक दर्जाचे केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले होते. नवी मुंबई तालीम संघ व इतर संघटनांनी याविषयी सिडको व महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु कुस्ती खेळाडूंना आश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळालेले नाही.
सद्य:स्थितीमध्ये शहरातील जवळपास 3क् खेळाडू ट्रक टर्मिनलजवळील मोकळ्या जागेवर कुस्तीचे धडे गिरवत आहेत. या खेळाडूंमध्ये नवी मुंबई पोलीस दलामधील खेळाडूंचाही समावेश आहे. येथील इमारतीच्या आवाराच्या कोप:यात लाल माती टाकून सराव केला जात आहे. गैरसोयींकडे दुर्लक्ष करून चांगले खेळाडू तयार करण्यासाठी तालीम संघाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. किमान आहे त्या जागेवर भिंत व त्यावर एक छत टाकून मिळावे अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत. खेळाडूंना कोणत्याही सुविधा नाहीत. संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिरगावकर, सचिव हिंदूराव आवळेकर, दत्तात्रय दुबे व इतर पदाधिकारी आखाडा व्हावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
ट्रक टर्मिनलजवळील उघडय़ा जागेवर खेळाडू रोज सराव करीत आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात डास आहेत. येथे उभे राहणोही अवघड होत असून, डास चावून खेळाडूंना डेंग्यू, मलेरिया होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये गोल्फपासून फुटबॉलर्पयत सर्व खेळांसाठी अत्याधुनिक मैदाने आहेत; मग कुस्तीकडेच दुर्लक्ष का, असा प्रश्न राष्ट्रीय सुवर्णपदक विजेचे कुस्तीपटू कृष्णा रासकर यांनी उपस्थित केला आहे.
च्नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक दर्जाचे कुस्ती केंद्र उभारण्यात यावे यासाठी 8 वर्षापूर्वी नगरसेविका चंद्रभागा शंकर मोरे यांनी ठराव मांडला होता.
च्सर्वसाधारण सभा व स्थायी समितीनेही ठरावास मंजुरी दिली होती. परंतु नंतर काही कारणास्तव हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. अद्याप पुन्हा कुस्ती केंद्र व्हावे यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने ठोस भूमिका घेतलेली नाही.