मॅन्चेस्टर सिटी, लिव्हरपुलची सलामी

By admin | Published: August 18, 2014 02:15 AM2014-08-18T02:15:29+5:302014-08-18T02:15:29+5:30

इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी लिव्हरपुल आणि मॅन्चेस्टर सिटीने विजयी सलामी दिली. लिव्हरपुलने २-१ अशा फरकाने साऊथअ‍ॅम्पटनचा, तर सिटीने न्युकास्टल युनायटेडचा २-० असा पराभव केला.

Manchester City, Liverpool salute | मॅन्चेस्टर सिटी, लिव्हरपुलची सलामी

मॅन्चेस्टर सिटी, लिव्हरपुलची सलामी

Next

लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी लिव्हरपुल आणि मॅन्चेस्टर सिटीने विजयी सलामी दिली. लिव्हरपुलने २-१ अशा फरकाने साऊथअ‍ॅम्पटनचा, तर सिटीने न्युकास्टल युनायटेडचा २-० असा पराभव केला.
तत्पूर्वी, शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत आर्सेनल, हल सिटी, अ‍ॅस्टन विला, टोटेन्हॅम हॉटस्पूर यांनी विजयी सलामी दिली, तर लेइस्टर सिटी विरुद्ध एव्हर्टन आणि वेस्ट ब्रॉमवीच विरुद्ध सदरलँड या लढती २-२ अशा बरोबरीत सुटल्या.
ब्रेडी हँगलँड याने ३५व्या मिनिटाला गोल करीत क्रिस्टल पॅलेसला आघाडीवर आणले होते. पहिला हाफ संपण्याच्या काही सेकंदांपूर्वी लॉरेन कोसायनीने गोल करून आर्सेनलला बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी दमदार खेळ करीत एकमेकांना गोल करण्यापासून रोखले. परंतु, अखेरच्या क्षणी अ‍ॅरॉन रॅमझीने दुसरा गोल करीत आर्सेनलच्या विजयावर २-१ असे शिक्कामोर्तब केले. टोटेन्हॅम हॉटस्पूर आणि वेस्ट हॅम युनायटेड यांच्यातही नाट्यमय झुंज पाहायला मिळाली. सामना बरोबरीत सुटेल असे वाटत असताना एरिक डायर याने ९०व्या मिनिटाला गोल करून टोटेन्हॅमला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Manchester City, Liverpool salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.