मॅँचेस्टर युनायटेडचा पराभव
By Admin | Published: September 17, 2016 05:00 AM2016-09-17T05:00:43+5:302016-09-17T05:00:43+5:30
स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मँचेस्टर युनायटेडला डच फुटबॉल क्लब फेनुर्डने एकमेव गोलच्या बळावर युरोपियन फुटबॉल लीग ग्रुप ए मध्ये पराभूत केले आहे.
रोटरडॅम : स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मँचेस्टर युनायटेडला डच फुटबॉल क्लब फेनुर्डने एकमेव गोलच्या बळावर युरोपियन फुटबॉल लीग ग्रुप ए मध्ये पराभूत केले आहे.
मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक जोस मेरिन्हो यांनी रोटरडॅमला झालेल्या या सामन्यात आपल्या संघात मोठे बदल केले होते. क्लबने कर्णधर वाएने रुनी, एंटोनियो वेलेंशिया आणि ल्युक शॉ याला बाहेर ठेवले होते. मात्र, सामन्यातील निराशाजनक आणि बेजबाबदार खेळामुळे मॅँचेस्टर युनायटेडला पराभव पत्करावा लागला.
मेरिन्हो यांनी फॉरवर्ड मार्कस् राशफोर्ड आणि अँथोनी मार्शलला यांना मैदानात उतरवले. तसेच, पॉल पोग्बा यालादेखील कायम ठेवले होते. मॅँचेस्टर युनायटेड क्लबचा हा याच अठवड्यातील दुसरा पराभव आहे. याआधी संघाला पारंपरिक प्रतिद्वंदी मँचेस्टर सिटीकडून पराभव पत्करावा लागला.
युनायटेडचा पुढचा सामना प्रीमियर लीगमध्ये रविवारी वॅटफोर्ड विरोधात होईल. रियल माद्रिद आणि चेल्सीचे माजी व्यवस्थापक मेरिन्हो यांनी या सामन्यात संघ पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही एंटेनियो आणि वेलेंशियो या खेळाडूंना आराम मिळावा यासाठी संघाबाहेर ठेवले. त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर पुनरागमन करावे, अशी अपेक्षा आहे.’
सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारणाऱ्या संघाचा बचाव करताना मेरिन्हो म्हणाले की, ‘ आम्ही दुसऱ्या हाफमध्ये पहिल्या हाफपेक्षा चांगला खेळ केला. यात आम्ही आक्रमक खेळ केला. मात्र फेनुर्डने चांगला बचाव केला.’सलग दोन पराभवांमुळे युनायटेड आता तालिकेत चौथ्या स्थानी घसरला आहे.