मनिका - मौमाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: June 3, 2017 12:45 AM2017-06-03T00:45:53+5:302017-06-03T00:45:53+5:30
श्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत पोहोचून इतिहास रचलेल्या भारताच्या मनिका बत्रा - मौमा दास यांचे स्पर्धेतील
डसेलफोर्ड : विश्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत पोहोचून इतिहास रचलेल्या भारताच्या मनिका बत्रा - मौमा दास यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मनिका - मौमा यांना बलाढ्य चीनच्या डिंग निंग - ल्यू शिवेन यांच्याविरुध्द पराभवास सामोरे जावे लागले. यासह भारतीय जोडीचे आव्हानही संपुष्टात आले.
चीनच्या अग्रमानांकीत आणि द्वितीय मानांकीत अनुक्रमे डिंग आणि ल्यू त्यांनी जबरदस्त वर्चस्व राखताना भारतीय जोडीला पुनरागमनाची एकही संधी न देता सरळ चार गेममध्ये ११-७, ११-७, ११-१, ११-३ असे नमवले. या शानदार विजयासह चीनच्या जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान, उप-उपांत्यपूर्व फेरीत मिळालेल्या वॉकओव्हरनंतर मनिका - मौमा यांनी अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जोडी ठरली होती.
दुसरीकडे, पुरुष एकेरीत भारताचा स्टार खेळाडू शरथ कमल अव्वल ३२ खेळाडूंमध्ये चीनच्या लिन गाओयुआनविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे. शरथच्या रुपाने स्पर्धेत भारताचे एकमेव आव्हान शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शरथच्या कामगिरीवर भारतीयांचे विशेष लक्ष असेल. (वृत्तसंस्था)