Tokyo Olympics : "पंतप्रधान मोदींनी केली नसती मदत, तर मीराबाई चानू जिंकूच शकली नसती पदक...!"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 01:22 PM2021-08-06T13:22:11+5:302021-08-06T13:29:50+5:30

मीराबाई चानूच्या या विजयानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बम बिरेन सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चानूला पदक जिंकण्यासाठी मदत केली.

Manipur CM Biren singh says PM Narendra Modi helped Mirabai Chanu to win medal | Tokyo Olympics : "पंतप्रधान मोदींनी केली नसती मदत, तर मीराबाई चानू जिंकूच शकली नसती पदक...!"

Tokyo Olympics : "पंतप्रधान मोदींनी केली नसती मदत, तर मीराबाई चानू जिंकूच शकली नसती पदक...!"

Next

नवी दिल्ली - वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) पहिल्याच दिवशी रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. मणिपूरच्या या खेळाडूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो (87 किलो + 115 किलो) भार उचलून रौप्य पदक जिंकले. तिच्या या जबरदस्त विजयानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बम बिरेन सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमीराबाई चानूला पदक जिंकण्यासाठी मदत केली. ते म्हणाले, पीएम मोदींनी चानूला उपचारासाठी अमेरिकेत पाठविले होते. त्याचवेळी, त्यांनी असेही म्हटले आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या आणखी एका एथलीटलाही मदत केली होती. (Manipur CM Biren singh says PM Narendra Modi helped Mirabai Chanu to win medal)

बिरेन सिंह यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि चानूला केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानले. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना बिरेन सिंह म्हणाले, 'यासंदर्भात जेव्हा चानूने मला सांगितले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिने सांगितले, की जर पंतप्रधानांनी तिला स्नायूंच्या ऑपरेशनसाठी आणि सरावासाठी अमेरिकेत पाठविले नसते, तर तिला हे पदक मिळाले नसते. एवढेच नाही, तर पंतप्रधानांनी तिला कशाप्रकारे थेट मदत केली,' हेही तीने सांगितले.

Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी

बिरेन सिंह यांनी सांगितले, की "चानूला पाठदुखीचा त्रास होता. यासंदर्भात पीएम मोदी आणि पीएमओला समजले. यानंतर, पंतप्रधानांनी स्वतः चानूच्या उपचारांचा आणि प्रशिक्षणाचा खर्च उचलून तिला अमेरिकेत पाठविले. याच बरोबर, पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या आणखी एका एथलीटला मदत केली आहे. पण सध्या मी ते नाव सांगणार नाही. भारतीय असल्याचा आणि पंतप्रधान मोदींसोबत काम करत असल्याचा अभिमान आहे."

Tokyo Olympics 2020 : लेकीला 'गुडलक' देण्यासाठी आईनं दागिने विकले; मीराबाईनं तेच परिधान करून पदक स्वीकारले; डोळे पाणावले

पदक जिंकल्यानंतर चानूने पंतप्रधानांचे आभार मानले होते. चानू म्हणाली होती, 'मी पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानते. त्यानी मला फार कमी वेळात सरावासाठी अमेरिकेत पाठविले. एकाच दिवसात सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. त्याच्यामुळेच मला चांगले प्रशिक्षण मिळाले आणि मी पदक जिंकण्यात यशस्वी झाले. माझ्या यशाचे श्रेय TOPS सारख्या (टारगेट ओलंपिक पोडियम योजना) योजनांनाही जाते.

Web Title: Manipur CM Biren singh says PM Narendra Modi helped Mirabai Chanu to win medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.