Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:33 PM2021-07-26T17:33:04+5:302021-07-26T17:40:36+5:30

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले.

Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department  | Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

Next

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. पोलिसांच्या सुरक्षेत मीराबाई विमानतळाबाहेर आली आणि तिच्या स्वागतासाठी मोठ मोठ्या हस्तींपासून ते क्रीडा प्रेमी उपस्थित होते. विमानतळातून बाहेर येत असताना कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात व जयघोष करत मीराबाईचे आभार मानले. मायदेशात परतताच मीराबाईला सरकारकडूनही मोठं गिफ्ट मिळालं. ( Olympic silver medallist Mirabai Chanu receives a warm welcome as the staff at the Delhi airport cheered for her upon her arrival from #TokyoOlympics) 

Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!


महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले. २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक पटकावणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी भारोत्तोलक ठरली. 

भारतात येताच मीराबाई म्हणाली, हे आव्हानात्मक होते. 2016पासून आम्ही तयारीला सुरुवात केली आणि रिओ ऑलिम्पिकनंतर सरावाच्या पद्धतीत बदल केला. मी आणि माझे प्रशिक्षक यांनी मागील पाच वर्ष स्वतःला झोकून टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी केली होती.''  


ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मायदेशात परतताच मणीपूर सरकारनं मीराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( क्रीडा) या पदावर नियुक्ती केली. ( Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Saikhom Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department: Chief Minister's Secretariat, Imphal) 

Web Title: Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.