मनोहर बीसीसीआय अध्यक्षपद सोडणार?, शरद पवारांचे नाव चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 08:38 AM2016-04-28T08:38:27+5:302016-04-28T08:38:27+5:30

अॅड. शशांक मनोहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काम स्वतंत्रपणे पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय)अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Manohar to quit the BCCI as president, Sharad Pawar's name in the discussion | मनोहर बीसीसीआय अध्यक्षपद सोडणार?, शरद पवारांचे नाव चर्चेत

मनोहर बीसीसीआय अध्यक्षपद सोडणार?, शरद पवारांचे नाव चर्चेत

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २८ -  बीसीसीआय अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काम स्वतंत्रपणे पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय)अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत. यादृष्टीने बीसीसीआयच्या प्रमुखपदाची त्यांची दुसरी टर्म निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता आहे.बीसीसीआय अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव चर्चेत येत आहे.
 
अनुभवी सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या मानगुटीवर बसल्या असताना सुप्रीम कोर्ट आणि बीसीसीआय यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याआधी मनोहर अध्यक्षपद सोडू इच्छितात. मनोहर यांना जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर दुस-यांदा बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर आयसीसीचे नवे स्वतंत्र चेअरमन म्हणून ते कामकाज पाहतील, असे मानले जात आहे. 
 
मनोहर यांच्याच काळात बीसीसीआय कार्यकारिणीने एक नियम पारित केला होता. त्यानुसार एक व्यक्ती एकाचवेळी बोर्ड अध्यक्ष आणि आयसीसीमध्ये नवी जबाबदारी सांभाळू शकणार नाही. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड 23 मे रोजी होणार आहे. सूत्रांनुसार आयसीसी बोर्डातील सर्वच सदस्य मनोहर यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांचे ‘स्वतंत्र’ चेअरमनपद जवळपास निश्चित झाले आहे. 

Web Title: Manohar to quit the BCCI as president, Sharad Pawar's name in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.