मनोहर यांचा राजीनामा

By Admin | Published: May 11, 2016 02:39 AM2016-05-11T02:39:44+5:302016-05-11T02:39:44+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस लोढा समितीतर्फे बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची शिफारस केली

Manohar resigns | मनोहर यांचा राजीनामा

मनोहर यांचा राजीनामा

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस लोढा समितीतर्फे बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची शिफारस केली असून त्याविरोधात बीसीसीआय न्यायालयात कायदेशीर लढाईला सामोरे जात असताना मनोहर यांनी राजीनामा दिला आहे, हे विशेष.
मनोहर यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. मनोहर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमनही आहेत. या महिन्यानंतर आयसीसीला आपल्या नव्या चेअरमनची निवड करायची असताना मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते, की चेअरमन स्वतंत्र राहणार असून तो आपल्या देशाच्या बोर्डात कुठल्याही पदावर राहणार नाही.
मनोहर यांनी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा
देत असून याचसोबत मी आयसीसीमध्येही बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून राजीनामा देत आहे. याव्यतिरिक्त मी आशियाई क्रिकेट परिषदेचे पदही सोडत आहे. बीसीसीआयच्या आमसभेने मला आशियाई क्रिकेट परिषदेवर नियुक्त केले होते.’’
बीसीसीआयचे सचिव ठाकूर यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘‘आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी स्वतंत्र सदस्य असणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.’’
दरम्यान, बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी सचिवाने दोन आठवड्यांच्या आत नोटीस देत विशेष आमसभा बोलाविणे गरजेचे आहे. त्यानंतर भविष्याबाबत निर्णय घेणे सोयीचे होते.’’
आयीसीसीने केलेल्या शिफारशीनुसार ५८ वर्षीय मनोहर कुठल्याही क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी राहणार नाहीत. याव्यतिरिक्त आयसीसी बोर्डाच्या दोन स्वतंत्र सदस्यांना त्यांच्या नावांची शिफारस करावी लागेल. बीसीसीआयच्या सूत्रानुसार मनोहर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करीत होते, पण न्यायालयाचा निकाल उन्हाळी सुट्यानंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या या वकिलाने अधिक प्रतीक्षा करण्याचे टाळले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ प्रशासकाने सांगितले, ‘‘शशांक मनोहर बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचा आम्हाला सर्वांना अंदाज होता. बीसीसीआय अडचणीच्या स्थितीत असताना, हा त्यांचा निर्णय योग्य किंवा अयोग्य, या वादात मला रस नाही.’’ बीसीसीआयच्या जास्तीत जास्त सदस्यांना आशा होती, की मनोहर सप्टेंबर २०१७ पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बोर्डाची प्रतिमा सुधारण्याची प्रक्रिया सुरू
ठेवतील, पण त्यांनी आयसीसीचे
पद सांभाळण्यास स्वारस्य दाखविल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.’’ (वृत्तसंस्था)
> पवार, ठाकूर, शुक्ला, शिर्के अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, राजीव शुक्ला व अजय शिर्के यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हेदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्याशिवाय राजीव शुक्लादेखील या पदाच्या शर्यतीत आहेत.
दुसरीकडे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील पुन्हा बीसीसीआय प्रमुखपदी विराजमान होऊ शकतात. अथवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांचे नाव अखेरच्या क्षणी पुढे येऊ शकते. शिर्के हे पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यांचे घरोब्याचे संबंध असल्याने पवार देखील त्यांच्यासाठी रणनीती आखू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
मात्र, नियमानुसार बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पंधरा दिवसांत बोलवणे आवश्यक आहे. मात्र अशी सभा बोलावण्याचा अधिकार
सचिव या नात्याने ठाकूर
यांना आहे.

Web Title: Manohar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.