सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर
By admin | Published: June 12, 2017 01:08 PM2017-06-12T13:08:10+5:302017-06-12T13:08:10+5:30
टीम इंडिया आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयापासून केवळ दोन पावलं दूर आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव करून भारताने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - टीम इंडिया आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयापासून केवळ दोन पावलं दूर आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव करून भारताने दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे भारताकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवातून पाकिस्तान अजूनही सावरलेला दिसत नाही. पाकिस्तानचा माजी विकेटकीपर राशिद लतीफ यांनी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसाठी अपशब्द वापरले आहेत. तर लतीफ यांना भारताचा युवा क्रिकेटपटू मनोज तिवारीने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्तानवर 124 धावांच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने नातवानंतर मुलगा. काही हरकत नाही मुलांनो, चांगले खेळलात. भारताचं अभिनंदन असं ट्विट केलं होतं. सेहवागच्या या ट्विटमुळे पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी सेहवागच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेकडून भारताचा पराभव झाल्यानंतर सेहवागला प्रत्युत्तर म्हणून लतीफने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याने सेहवागबाबत अपशब्दांचा वापर केला होता.
यानंतर मनोज तिवारीने व्हिडीओद्वारे राशिद लतीफ यांना उत्तर दिलं आहे. मी व्हिडीओ मेसेज कधी अपलोड करत नाही, पण आज एक व्हिडीओ पाहून राहावलं नाही, राशीद लतीफ 60 सेकंदांच्या स्वस्त लोकप्रियतेसाठी सेहवागबाबत अशा शब्दांचा वापर करत आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. सेहवागचे विक्रम इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे राशिद लतीफ यांना कोणीतरी अनुवाद करुन समजावलं पाहिजे. तुम्ही ज्या सेहवागबद्दल बोलताय, त्याच्या जवळही पोहोचू शकत नाही. तुमच्या ज्या मित्राला इंग्लिश समजतं त्याला सांगा की, मला सेहवागचा विक्रम हिंदीत अनुवाद करुन समजावं.”‘हा व्हिडीओ मेसेज एका मुर्खासाठी आहे, ज्याचं नाव राशिद लतीफ आहे. तुम्ही अतिशय बेशरम व्यक्ती आहात. तोंड पाहिलंय का तुमचं? तोंड काळं करुन फिरताय. तुम्हाला लाज-शरम नाही. जे दोन-चार खेळाडू तुम्हाला पाहून, तुमची विकेटकीपिंग पाहून शिकतात, ते लक्षात घेऊन तरी यापुढे अशाप्रकारचा व्हिडीओ रेकॉर्ड करु नका. हा व्हिडीओ पाहून तुमची चपलेने धुलाई करायला हवी. असा व्हिडीओ शेअर करताना यापुढे शब्दांचा वापरता करताना काळजी घ्या, असा इशाराही तिवारीने दिला आहे.
पाहा व्हिडीओ-
— Rashid Latif (@iamRashidLatif) June 9, 2017
Dis video message is 4 an idiot called Rashid Latif ( Former Pakistan wicketKeeper ) cont... pic.twitter.com/3dNICZQZ6Y
— Manoj Tiwary (@tiwarymanoj) June 11, 2017
— Manoj Tiwary (@tiwarymanoj) June 11, 2017