ऑलिम्पिकमध्ये मनप्रीत व मेरी कोम भारताचे ध्वजवाहक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:58 AM2021-07-06T10:58:40+5:302021-07-06T10:58:45+5:30
भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेच्या आयोजन समितीला आपला निर्णय कळविला आहे.
नवी दिल्ली : सहावेळची विश्वचॅम्पियन व लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेता बॉक्सर एमसी मेरी कोम व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग २३ जुलैपासून टोकियोमध्ये प्रारंभ होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत भारतातर्फे पदकाचा सर्वात मोठ्या दावेदारांपैकी मल्ल बजरंग पूनिया ८ ऑगस्टला समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहकाची भूमिका बजावेल.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेच्या आयोजन समितीला आपला निर्णय कळविला आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारताचे दोन ध्वजवाहक (एक पुरुष व एक महिला) राहणार आहे. आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी अलीकडेच आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी ‘लैंगिक समानता’ निश्चित करण्यासाठी याची माहिती दिली होती. मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासाठी हा महत्त्वाचा क्षण असेल.’,