मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:52 PM2024-10-26T15:52:10+5:302024-10-26T16:05:30+5:30
ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदकांची कमाई करणारी मनू भाकर.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदकांची कमाई करणारी मनू भाकर. मनूने या ऐतिहासिक कामगिरीसह प्रसिद्धी मिळवली. तेव्हापासून तिला अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात आले. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन ऑलिम्पिकपटू चर्चेत राहत असते. आता मनूने एक अनोखी पोस्ट करुन सर्वांचे लक्ष वेधले, मात्र काही वेळातच तिला आपली पोस्ट डिलीट करावी लागली. "मला सांगा, मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? धन्यवाद", असे मनू भाकरने एक पोस्ट करत म्हटले. याशिवाय तिने पुरस्कार, खेलरत्न आणि ऑलिम्पिक्स असे काही हॅशटॅगदेखील वापरले. पण, काही वेळातच मनूने ही पोस्ट डिलीट केली.
खरे तर नेटकऱ्यांनी मनू भाकरला संबंधित पोस्टवरुन ट्रोल केल्याने तिला पोस्ट डिलीट करावी लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी मनूची खिल्ली उडवली.
This is disgusting from Manu bhaker. Absolute horrible lady pic.twitter.com/iRS1XHsqHb
— Arun (@_iArun___) October 26, 2024
Who is the admin of this official account? Because of insensitive tweets like this, Manu Bhaker gets trolled.
— Sayak Dipta Dey 🇮🇳 (@sayakdd28) October 26, 2024
I am 100% sure this account is not with Manu Bhaker, even during the Olympic Final, this account kept tweeting throughout the night.
REMOVE THE ADMIN AND SAVE HER. https://t.co/tSUQHn9wE5
She deleted this post 😁
— chacha monk (@oldschoolmonk) October 26, 2024
And it's not a parody account pic.twitter.com/4gvTUqionn
मनू भाकरची ऑलिम्पिकमधील कामगिरी
२८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.