मनू भाकर पुन्हा पॅरिसला जाणार; गोलकीपर श्रीजेशसोबत महत्वाची जबाबदारी पार पाडणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:28 PM2024-08-09T17:28:33+5:302024-08-09T17:29:13+5:30
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे.
Manu Bhaker and PR Sreejesh India Flagbearer : खेळाचा 'महाकुंभ' समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 26 जुलै रोजी सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकांची कमाई केली आहे. आपापल्या स्पर्धा झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशात परतले आहेत. पण, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर यांची भारतीय दलाचे ध्वज वाहक म्हणून निवड केली आहे.
IOA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या समारोप समारंभात(11 ऑगस्ट) नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची संयुक्त ध्वजवाहक म्हणून निवड करताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आनंद होत आहे.'
🚨- Sreejesh named India flagbearer with Manu Bhaker for Paris 204 Closing Ceremony
— Team India (@WeAreTeamIndia) August 9, 2024
Paris, August 9: The Indian Olympic Association is delighted to announce the nomination of hockey goalkeeper PR Sreejesh as the joint flagbearer with pistol shooter Manu Bhaker at the Closing…
दरम्यान, IOA अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या की, 'शेफ डी मिशन गगन नारंग आणि संपूर्ण भारतीय दलासाठी श्रीजेशेची निवड करणे खूप भावनिक होते. श्रीजेशने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय हॉकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मी भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी चर्चा केली, तेव्हा नीरजनेही श्रीजेशचे नाव सुचवले असते. यावरुन नीरजला श्रीजेश आणि भारतीय खेळातील त्याच्या योगदानाबद्दल असलेला प्रचंड आदर दिसून येतो.'
मनूला पुन्हा पॅरिसला जावे लागेल
नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. मनूने 10 मीटर एअर शूटिंगमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले. यानंतर मनूनेही सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगच्या साथीने दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कामगिरी केली. स्पर्धा झाल्यानंतर मनू भारतात परतली, पण आता तिला या निरोप समारोप समारंभासाठी पुन्हा पॅरिसला जावे लागेल. तर पीआर श्रीजेशने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी गोलरक्षक म्हणून चमकदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव करुन कांस्यपदकावर नाव कोरले. श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.