युवा आॅलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरच्या हाती असेल ध्वज!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 06:14 AM2018-10-02T06:14:08+5:302018-10-02T06:15:47+5:30
या स्पर्धेसाठी भारताचा ६८ सदस्यीय दल अर्जंेटिना येथे रवाना होणार आहे. ज्यात ४६ खेळाडूंचा समावेश आहे.
नवी दिल्ली : ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) येथे ६ ते १८ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसºया युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून युवा नेमबाज मनू भाकर ही असणार आहे. भारतीय संघाला निरोप देण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय आॅलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी १६ वर्षीय भाकर हिच्या नावाची घोषणा केली. तिच्या नेतृत्वाखाली हा संघ रवाना होईल.
हा सन्मान मिळल्यानंतर मनू म्हणाली की, मी भारतीय दलाची ध्वजवाहक होईल, असा मी कधी विचारही केला नाही. हा माझा सन्मान आहे. खूप अभिमान वाटतो. या स्पर्धेसाठी भारताचा ६८ सदस्यीय दल अर्जंेटिना येथे रवाना होणार आहे. ज्यात ४६ खेळाडूंचा समावेश आहे. भारत १३ खेळांमध्ये आपले आव्हान सिद्ध करणार आहे. गोवा आॅलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता हे ‘ चेफ द मिशन’ आहेत.या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड आणि आयओएचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. राठोड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ते दिवस गेले जेव्हा भारत केवळ सहभागासाठी मोठ्या स्पर्धेत भाग घेत होता. मला विश्वास आहे की, तुम्ही सगळे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणार आहात आणि देशाला पदक जिंकून गौरव प्राप्त करून देणार आहात. खेळावर लक्ष आणि शिस्तबद्ध राहा. कारण तुम्ही देशाचे दूत आहात. देशाची प्रतिमा खराब होईल, अशी कोणतीही गोष्ट कुणालाही करू देऊ नका. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.