बांगला देश दौऱ्यास अनेक संघ नकार देऊ शकतात: मनी
By admin | Published: July 5, 2016 08:36 PM2016-07-05T20:36:02+5:302016-07-05T20:36:02+5:30
ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ५ : ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देश बांगला देशचा दौरा करण्यास नकार देऊ शकतात, अशी शंका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली आहे.
बांगला देश क्रिकेटला पाकिस्तानसारख्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे वक्तव्य करीत मनी पुढे म्हणाले,ह्य अनेक देश बांगला देशात येण्यास टाळाटाळ करू शकतात.ह्ण याच आठवड्यात ढाका येथील एका कॅफेत झालेल्या
दहशतवादी हल्ल्यात २० विदेशी नागरिक मारले गेले. तेव्हापासून इंग्लंड सप्टेंबरमध्ये बांगला देश दौऱ्यावर जाणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली.
ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल. दहशतवादामुळे नुकसान सोसण्याची वेळ बीसीसीबीवर येईल, का
अशी भीती वाटते. स्फोटात विदेशी नागरिक मारले गेल्यानंतर इंग्लंडची मनधरणी करणे बांगला देशसाठी सोपे जाणार नाही. वेस्ट इंडिजचा १९ वर्षांखालील संघ देखील सुरक्षेचे कारण पुढे करीत काही वर्षांआधी बांगला देश दौरा अर्धवट सोडून निघून गेला होता. आॅस्ट्रेलियाने देखील यंदा बांगला देशात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातून माघारीचा निर्णय
घेतला होता, अशी आठवण मनी यांनी करुन दिली.
ते पुढे म्हणाले,ह्यभारताने २००७ पासून द्विपक्षीय मालिका न खेळल्याने पाक क्रिकेटला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागत आहे. पीसीबीने शासकीय हस्तक्षेप टाळून कठोर निर्णय घ्यायला शिकले पाहिजे, असे माझे मत आहे. द्विपक्षीय मालिकेसंदर्भात बीसीसीआय आपले धोरण बदलत नाही तोवर पाकने आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळू नये. पाक संघ आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळतो.
तेव्हा आयसीसी बोर्ड आणि सदस्य राष्ट्रांना मोठा लाभ होतो. बांगला देश क्रिकेट बोर्डाने अशा स्थितीतही विदेशी संघांचे देशात खेळण्यासाठी मन वळविल्यास मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाला विदेशी संघांचे मन वळविण्यात आलेल्या अपयशाचे वाभाडे निघेल. पीसीबीने विदेशी संघांना पाकमध्ये येण्यास विनंती
केली का आणि त्यांना यश का आले नाही, हा प्रश्न चर्चेत येणार आहे.
पाक क्रिकेटसाठी आयसीसीकडे विशेष पॅकेजची मागणी करणाऱ्या पीसीबीवर मनी यांनी कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले,ह्य पीसीबीने आयसीसीपुढे हात पसरून देशाची मान झुकविली आहे. आयसीसीकडे भीक मागण्याऐवजी पीसीबीने
स्वत:च्या खर्चावर नियंत्रण आणायला हवे, असा सल्ला मनी यांनी दिला.