30 मार्च म्हणजे "जागतिक माफी दिन", अश्विनने घेतली कांगारूंची फिरकी
By admin | Published: March 30, 2017 05:57 PM2017-03-30T17:57:24+5:302017-03-30T17:57:24+5:30
भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीने मैदानावर फलंदाजांचं तोंड बंद करतोच पण वेळ पडली की तो शब्दांनीही हल्ला चढवतो
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीने मैदानावर फलंदाजांचं तोंड बंद करतोच पण वेळ पडली की तो शब्दांनीही हल्ला चढवतो. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मैदानावर जितका तणाव होता तितकाच मैदानाबाहेरही होता. ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी फलंदाजांनी खास करून भारताचा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता मालिका संपल्यानंतर माफीसत्राला सुरूवात झाली आहे.
नुकतंच विराट कोहलीवर केलेल्या आरोपाबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने त्याची माफी मागितली. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने धरमशाला कसोटीतून माघार घेतली असा आरोप हॉजने केला होता. मालिकेचा निकाल लावणा-या कसोटीत तू खेळणार नाहीस आणि पुढच्या आठवडयापासून सुरु होणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार. तू शेवटच्या कसोटीत नाही खेळलास तर ते योग्य ठरणार नाही अशा शब्दात हॉजने विराटवर टीका केली होती. ब्रॅड हॉजच्या या विधानाचा भारतातील क्रिकेटपटूंनी चांगलाच समाचार घेतला होता. या विधानामुळे आयपीएलमधील आपला रोजगार धोक्यात येऊ शकतो याची कल्पना आल्याने हॉजने विराटची माफी मागितली. ब्रॅड हॉज गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक आहे. मी जे विधान केले त्याबद्दल मी भारतातील लोकांची, क्रिकेट चाहत्यांची, भारताच्या क्रिकेट संघाची विशेषकरुन विराट कोहलीची माफी मागतो असे हॉजने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. कोणावर टीकेचा, अपमान करण्याचा किंवा कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. विराटबद्दल माझ्या मनात आदर असून त्याच्याबद्दल कोणताही वाईट भावना नाही असे हॉजने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
यानंतर आर. अश्विनने हॉजला लक्ष्य करताना ट्विट केलं आहे. यापुढे 30 मार्च हा जागतिक माफी दिवस म्हणून ओळखला जाईल असं ट्विट अश्विनने केलं आहे. त्याचं हे ट्विट सोशल मीडिया वापरणा-यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट आणि लाइक केलं आहे.
On a lighter note, from this year onwards 30th march will be remembered as world apology day.
Web Title: March 30 means "World Waiver Day", Ashwin took out a spin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.