मारिया शारोपोव्हा ब्रिस्बेन क्वीन
By admin | Published: January 10, 2015 11:44 PM2015-01-10T23:44:35+5:302015-01-10T23:44:35+5:30
महिला एकेरीत सर्बियाच्या अॅना इव्होविचचा तीन सेटमध्ये पराभव करून ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
ब्रिस्बेन : रशियाची अव्वल टेनिसपटू मारिया शारोपोव्हाने पहिला सेट गमाविल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महिला एकेरीत सर्बियाच्या अॅना इव्होविचचा तीन सेटमध्ये पराभव करून ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
शारोपोव्हाने पहिला सेट टाईब्रेकमध्ये ६-७ गुणांनी गमाविला होता. नंतर तिने अफलातून खेळ करीत दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे
६-३, ६-३ असा जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयाने शारोपोव्हाने १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेतील आपल्या प्रतिस्पर्धींना सूचित केले विजेतेपदाची दावेदार मीसुध्दा आहे. शारोपोव्हाने सात वर्षांपूवी एकमेव आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले होते.
पुरुषांच्या एकेरीत स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने लौकिकास साजेसा खेळ करताना एकेरीच्या सेमीफायनलमध्ये अवघ्या ५३ मिनिटांत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हवर ६-२, ६-२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला़
स्पर्धेच्या फायनलमध्ये फेडररचा सामना आता राओनिकशी होणार आहे़ राओनिकने यूएस ओपनचा फायनलिस्ट जपानच्या केई निशिकोरीचा ६-७, ७-६, ७-६ असा पराभव करताना आगेकूच केली़