मारियन बार्तोलीचे ‘इंडियन कनेक्शन’

By admin | Published: January 17, 2015 02:57 AM2015-01-17T02:57:04+5:302015-01-17T02:57:04+5:30

माजी इंडियन चॅम्पियन आणि फ्रान्सची स्टार टेनिसपटू मारियन बार्तोली हिने ‘इंडियन कनेक्शन’चा खुलासा करताना भारत आणि भारतीय जेवणाची आपल्याला विशेष आवड असल्याचे म्हटले आहे़

Marian Bartoli's 'Indian Connection' | मारियन बार्तोलीचे ‘इंडियन कनेक्शन’

मारियन बार्तोलीचे ‘इंडियन कनेक्शन’

Next

मुंबई : माजी इंडियन चॅम्पियन आणि फ्रान्सची स्टार टेनिसपटू मारियन बार्तोली हिने ‘इंडियन कनेक्शन’चा खुलासा करताना भारत आणि भारतीय जेवणाची आपल्याला विशेष आवड असल्याचे म्हटले आहे़
मुंबई मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर असलेली बार्तोली म्हणाली, की माझा मित्र हा भारतीय वंशाचा आहे़ तो सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे़ त्यामुळे संबंध भारताशी आहे़ या अनुभवी खेळाडूने मात्र आपल्या मित्राच्या नावाचा खुलासा केला नाही़ मित्राची आई मला नेहमी भारतीय हॉटेल्समध्ये घेऊन जाते़ त्यानंतर आता पुन्हा भारतातील जेवण मिळणार असल्याने आनंदी आहे, असेही तिने सांगितले़
२०१४ मध्ये विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या बार्तोलीने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती़ याबद्दल ती म्हणाली, की फिटनेसच्या कारणामुळे मी टेनिसमधून निवृत्ती घेतली़ टेनिसव्यतिरिक्त बार्तोलीला पेंटिंगची आवड आहे़ तसेच फॅशनमध्ये नशीब आजमावणार असल्याचेही तिचे म्हणणे आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Marian Bartoli's 'Indian Connection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.