'शॉर्ट ऑफ ब्रेन'बद्दल मार्क निकोलसने सॅमीची माफी मागितली
By admin | Published: April 4, 2016 05:24 PM2016-04-04T17:24:56+5:302016-04-04T17:29:53+5:30
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांनी ईएसपीएन आणि क्रिकइन्फोवर लिहीलेल्या आपल्या स्तंभामध्ये वेस्ट इंडिज संघ आणि डॅरन सॅमीची माफी मागितली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - टी-२० वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिजच्या संघाला कमी लेखून डोक नसलेल्या क्रिकेटपटूंचा संघ म्हणून त्यांच्यावर टीका करणारे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांनी ईएसपीएन आणि क्रिकइन्फोवर लिहीलेल्या आपल्या स्तंभामध्ये वेस्ट इंडिज संघ आणि डॅरन सॅमीची माफी मागितली आहे.
वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप विजयानंतर मार्क यांना ही उपरती झाली आहे. मला वेस्ट इंडिजच्या संघाबद्दल पूर्ण आदर आहे ते डोक्याने कमी नाहीत असे मार्क यांनी आपल्या स्तंभात मान्य केले आहे.
मी सहज म्हणून वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू डोक्याने कमी आहेत असे म्हटले होते. ते बिनडोक आहेत असे मी म्हटले नव्हते अशी सारवासारव मार्कने केली आहे. सॅमीनेही विजयानंतर मार्कवर निशाणा साधला होता.
मार्क निकोलसच्या टीकेमुळे आमच्यामध्ये संघ भावना जागृती झाली आणि आम्ही अधिक जवळ आलो असे सॅमीने म्हटले होते. मार्कने वर्ल्डकप विजयासाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पसंती दिली होती.