आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरीकोमने गाठली उपांत्यपूर्व फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:03 AM2017-11-03T03:03:13+5:302017-11-03T03:03:22+5:30

पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि पदार्पण करणा-या शिक्षा यांनी येथे पहिल्या फेरीच्या लढती जिंकल्यानंतर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी यशस्वी ठरला.

Marquee reached the quarterfinals in the Asian Boxing Championship | आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरीकोमने गाठली उपांत्यपूर्व फेरी

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरीकोमने गाठली उपांत्यपूर्व फेरी

Next

हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) : पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि पदार्पण करणा-या शिक्षा यांनी येथे पहिल्या फेरीच्या लढती जिंकल्यानंतर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी यशस्वी ठरला.
आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीकोमने स्थानिक खेळाडू दिमेय थि त्रिन्ह कीयू हिला लाइट फ्लायवेट (४८ किलो) वजन गटात पराभूत केले. त्याचबरोबर याच वजन गटात चार वेळेस सुवर्णपदक जिंकणा-या मेरीकोमने तिच्या आवडत्या वजन गटातील लढतीत पुनरागमन केले आहे. याआधी ती ५१ किलो वजन गटात खेळली होती. हा वजन गट २०१२ मध्ये आॅलिम्पिक वजन गट बनविण्यात आला होता.
शिक्षा (५४ किलो) हिनेदेखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्यात यश मिळविले. तिने सुरुवातीच्या फेरीत मंगोलियाच्या ओयुन-अर्डेन नेरगुई हिला पराभूत केले. आता ती फेरांगिज कोशिमोव्हा हिच्याविरुद्ध खेळेल. कोशिमोवा हिला पहिल्या फेरीत बाय मिळाला.
आज भारताकडून मेरीकोमने सुरुवात केली. तिने संथ सुरुवात केली; परंतु दुसºया फेरीत तिने आक्रमक पवित्रा अवलंबिला व तिने कीयू हिला थेट पंच मारण्याची संधीच मिळू दिली नाही.
आता मेरीकोमचा सामना तैपेईच्या मेंग चियेह पिंग हिच्याशी होईल. पिंग हिने थायलंडच्या पानप्रदाब प्लोदसाइ हिला नमवले. या स्पर्धेत २० देशांतील १०७ खेळाडू सहभागी झाले आहेत.

Web Title: Marquee reached the quarterfinals in the Asian Boxing Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा