मार्श, मॅक्सवेलला दंड

By Admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30

हैदराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल याच्यावर शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

Marsh, Maxwell penalty | मार्श, मॅक्सवेलला दंड

मार्श, मॅक्सवेलला दंड

googlenewsNext
दराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल याच्यावर शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनीही क्रिकेट सामग्री, कपडे आणि मैदानात आक्षेपार्ह वर्तन केल्याचा त्यांच्यावरील आरोप मान्य केला आहे. या दोन्ही खेळाडूंवर प्रत्येकी २५ टक्के दंड लावण्यात आला आहे आणि तो त्यांनी मान्य केला आहे. या सामन्यात पंजाबला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. पंजाबची या स्पर्धेत कामगिरी सुमार होत आहे आणि पाच सामन्यांतील चार पराभवांसह ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत.

पुणे संघ खराब खेळतोय : फ्लेमिंग
पुणे : रायजिंग पुणे सुपर जायंटस् संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आयपीएल ९ मध्ये आपल्या संघाच्या सलग चौथ्या पराभवावर निराशा व्यक्त केली आहे. पुणे संघ खराब खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे संघाच्या घरच्या मैदानावर सलग दोनदा आणि स्पर्धेतील एकूण चौथा पराभव ठरला होता.
ते म्हणाले, 'आम्ही जिंकण्यासाठी आवश्यक खेळ करीत नाही आणि या परिणामाचे हे कारण आहे. या सामन्यात आमची कामगिरी खूप सुमार होती. आम्ही या मैदानावर जी १६0 धावसंख्या उभारली ती चांगली होती. या मैदानावर फिरकी गोलंदाजांसाठी संधी होती; परंतु त्याचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. आमचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी व विशेषत: मधल्या षटकांमधील कामगिरी खूपच खराब होती. आम्ही जिंकण्याच्या स्थितीत असताना पराभूत होणे हे स्वीकार्य नाही.'

Web Title: Marsh, Maxwell penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.