'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:38 PM2020-03-30T16:38:19+5:302020-03-30T16:39:35+5:30

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, सौरव गांगुली यांच्या तुलनेत ही मोठी मदत आहे.

Mary Kom donates one month salary and releases Rs 1 crore from MPLAD fund to fight against coronavirus svg | 'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

Next

वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सर्वाधिक सहा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मोठी मदत जाहीर केली. सुपर मॉम मेरी कोमनं तिचा एक महिन्याचा पगार सरकारला देण्याचा निर्णय घेतला. शिवाय राज्यसभा सदस्य असलेल्या मेरी कोमनं Members of Parliament Local Area Development Scheme अंतर्गत 1 कोटींचा निधी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी दिला आहे.

यापूर्वी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. गोल्डन गर्ल हिमा दास हिनंही एका महिन्याचा पगार आसाम सरकारला दिला आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांना अन्न आणि मुलभूत वस्तू देण्याचा निर्धार केला. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही आज पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला, 
   
कोणत्या क्रिकेटपटूंन किती मदत केली?
गौतम गंभीर - 1.5 कोटी 
सुरेश रैना - 52 लाख ( 31 लाख पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी) 
सौरव गांगुली - 50 लाख (गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ) 
सचिन तेंडुलकर - 50 लाख ( केंद्र आणि राज्य सरकराला प्रत्येकी 25 लाख)
अजिंक्य रहाणे - 10 लाख ( महाराष्ट्र राज्य सरकार)
मुंबई क्रिकेट असोसिएशन - 1 कोटी ( केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी 50 लाख)
बीसीसीआय - 51 कोटी
युसूफ व इरफान पठाण - 4000 मास्क

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात?

विराट-अनुष्कानं नक्की किती रुपयांची केली मदत? आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

क्रिकेट चाहत्यांसाठी GOOD NEWS; पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार!

अमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी

 

Web Title: Mary Kom donates one month salary and releases Rs 1 crore from MPLAD fund to fight against coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.