मानलं मेरी कोमला; ऑलिम्पिकमधील तिच्या पराभवानंतर ढसाढसा रडणाऱ्या चिमुकलीची घेतली भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:58 PM2021-08-24T14:58:29+5:302021-08-24T14:58:47+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला. क्षणभर मेरीलाही आपण हरलोय हे माहित नव्हते. चुरशीच्या या सामन्यात मेरीनं कडवी झुंज दिली आणि आपण जिंकू असा विश्वास तिला होता. पण, रेफरीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा हात उंचावला अन् मेरीचं स्वप्न अपूर्ण राहिले. मेरीचा हा पराभव टीव्हीवर पाहणाऱ्या चिमुरडीला रडू आवरेनासे झाले होते.
राष्ट्रीय संघापेक्षा परदेशी खेळाडू आयपीएलला का देतात महत्त्व?; हे आहे प्रमुख कारण
मेरीनं स्वतः त्या चिमुरडीचा व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं होतं की,''चिमुकले.. जेव्हा तुला भेटण्याची संधी मिळेल, तेव्हा तुला मिठी मारीन. जर तुला कुठल्या खेळात रस असेल तर त्यासाठीही मी तुला मदत करेन.''
मेरीनं तिचा शब्द पाळला अन् भारतात आल्यावर त्या छोट्या फॅनची भेट घेतली. तिनं फोटो पोस्ट करून लिहिलं की,मला आज नवीन फॅन मिळाली. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत माझ्या पराभवानंतर ती रडली होती.''
नेटिझन्सकडून कौतुक
I've found my new fan and follower for boxing who really cheers and cried for me during #Tokyo2020pic.twitter.com/Oi20WVRKCD
— M C Mary Kom OLY (@MangteC) August 22, 2021
Great gesture Ma'am...You are an inspiration to many...🥊🇮🇳🙏
— Jagannath P Nayak 🇮🇳 (@nayakjp13) August 22, 2021
you are a true inspiration for many persons like this
— Devraj Meena (@djdevraj123) August 23, 2021