मेरीकोमची अंतिम फेरीत धडक; लवलीनाचे कांस्यवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 05:08 AM2018-11-23T05:08:25+5:302018-11-23T05:08:46+5:30

सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले.

Mary Kom storms into World Boxing Championships final, Lovlina Borgohain gets bronze | मेरीकोमची अंतिम फेरीत धडक; लवलीनाचे कांस्यवर समाधान

मेरीकोमची अंतिम फेरीत धडक; लवलीनाचे कांस्यवर समाधान

Next

नवी दिल्ली : सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. त्याचवेळी भारताची युवा बॉक्सर लवलीना बोरगोहेन (६९ किलो) हीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.
आपले सहावे सुवर्ण आणि चॅम्पियनशीपमधील सातवे पदक मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेरीकोमने आपला अनुभव पणाला लावत रणनितीनुसार खेळ केला. या जोरावर मेरीकोमने उपांत्य फेरीत किम ह्यांग हिला सर्वसमंतीने झालेल्या निर्णयाद्वारे ५ -० असे पराभूत केले.
मेरीकोमने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत किम ह्यांग हिलाच पराभूत केले होते. ती खूपच आक्रमक खेळ करत होती. मणिपूरच्या बॉक्सरने आपल्या अचूक आणि वेगवान पंचच्या जोरावर तिन्ही पंचांकडून २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असे गुण मिळवले.
आता २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत युक्रेनच्या हन्ना ओखोटा हिच्याविरुद्ध मेरीकोम विश्वविक्रमी सुवर्ण पदक मिळवण्यासाठी भिडेल. ओखोटाने जापानच्या मडोका वाडा हीला ५-० ने पराभूत केले.
मेरीकोमने नुकत्याच पोलंडमध्ये झालेल्या सिलेसियान बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये हन्ना ओखोटा हिलाच पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
३५ वर्षीय मेरीकोमचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तिच्या प्रत्येक पंचवर प्रेक्षकांनी टाळ््या वाजवून तीचा उत्साह वाढवला.
दुसरीकडे, २१ वर्षीय लवलीना हिला वेल्टरवेट उपांत्य फेरीत चीनी तायपेची बॉक्सर चेन निएन चीनकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. रेफ्रीने तिसºया फेरीत लवलिनाचा एक गुण कमी केला. लवलिना या आधी चेन निएनविरुद्ध झालेल्या सामन्यातही पराभूत झाली होती. चेन निएनचा सामना आता चीनच्याच दुसºया मानांकित होंग गू सोबत होईल. तिने जर्मनीच्या नादिने अपेट्सला ४-१ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)

सावध सुरुवातीनंतर मेरीचा आक्रमक पवित्रा
मेरीकोम पहिल्या फेरीत काहीशा अधिक सावधनतेने खेळत होती. मात्र नंतर तिने उत्तर कोरियाच्या बॉक्सरला फारशी संधी दिली नाही.
दुसºया फेरीत मेरीने आपल्या रणनितीप्रमाणे खेळ केला. त्यामुळे तिने सहजतेने गुण मिळवले. तिसºया फेरीत मेरीकोम अधिक आक्रमक झाली आणि तिने गुण मिळवण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. या दरम्यान तिने उजव्या हाताने सरळ किम ह्यांगच्या चेहºयावरच जोरदार ठोसे मारले.

मी ह्यांगला व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते. तरीही मी थोडी सतर्क होते. कारण कोणतीही बॉक्सर कधीही बाजी पलटवू शकते. प्रत्येक लढतीतून काही ना काही शिकायला मिळते. आम्ही लढतीचे आकलन केले होते. रक्षण आणि आक्रमणाची योग्य रणनिती तयार केली होती. अंतिम सामन्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या खेळाचे आकलन करेल आणि देशवासियांपुढे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून देशाला गौरवान्वित करेल.
- मेरीकोम

Web Title: Mary Kom storms into World Boxing Championships final, Lovlina Borgohain gets bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.