Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:00 PM2020-05-15T12:00:05+5:302020-05-15T12:01:15+5:30
ऑलिम्पियन आणि राज्यसभा सदस्य असलेल्या मेरी कोमच्या घरी अचानक पोलीस आले..
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 45 लाख 27,291 वर पोहोचली आहे. त्यापैकी 17 लाख 05,835 जणं बरी झाली आहेत, परंतु 3 लाख 03,418 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 82,103 वर पोहोचली आहे. 27,977 रुग्ण बरे झाले असले तरी 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील संख्याही वाढत चालली आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी गुरुवारी दिग्गज बॉक्सर मेर कोमला सरप्राईज दिले. ऑलिम्पियन आणि राज्यसभा सदस्य असलेल्या मेरीच्या मोठ्या मुलासाठी दिल्ली पोलीस चक्क केक घेऊन आले. लॉकडाऊनमुळे मेरीचा मोठा मुलगा प्रिन्स याला वाढदिवस साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी त्याला हे सरप्राईज दिले.
मेरीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात दिल्ली पोलीस तिच्या मुलासाठी केक घेऊन आले आणि त्याच्यासाठी वाढदिवसाचं गाणंही गायले. मेरीनं दिल्ली पोलिसांचे आभार मानले. तिनं लिहीलं की,''माझ्या मुलाचा वाढदिवस स्पेशल केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे आभार. तुम्ही खरे योद्धा आहात. तुमच्या समर्पणाला आणि वचनबद्धतेला माझा सलाम.''
पाहा व्हिडीओ...
Thank you @DCPNewDelhi for making this birthday so special for my younger son Prince Kom.
— Mary Kom OLY (@MangteC) May 14, 2020
You all are real frontline warriors, i salute you all for your dedication and commitment.@CPDelhi@DelhiPolice@LtGovDelhi@pragya_92pic.twitter.com/5LOcEN3CH8
मेरीनं सांगितलं की,''परिस्थिती लवकरच पूर्वपदावर यावी, याची आम्ही आतुरतेनं वाट पाहत आहोत. हा व्हायरस आपला शत्रू आहे. या व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धेतही बदल पाहायला मिळेल. विशेषतः ज्या खेळांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूशी संपर्क होतो, अशा खेळांची चिंता आहे.''
IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत
Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज