मेरी, सरिताचा सुवर्णपंच

By admin | Published: February 17, 2016 02:41 AM2016-02-17T02:41:34+5:302016-02-17T02:41:34+5:30

एम. सी. मेरी कोम व पूजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले. तर एल. सरिता देवीने प्रतिकूल परिस्थितीनंतर विजय मिळवला.

Mary, Sarita's golden punch | मेरी, सरिताचा सुवर्णपंच

मेरी, सरिताचा सुवर्णपंच

Next

शिलाँग : एम. सी. मेरी कोम व पूजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले. तर एल. सरिता देवीने प्रतिकूल परिस्थितीनंतर विजय मिळवला. भारताने महिला बॉक्सिंगमध्ये तिन्ही सुवर्णपदके पटकावत १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत क्लीन स्वीप करण्यात यश मिळवले.
खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करीत असलेल्या लंडन आॅलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने (५१ किलो) श्रीलंकन प्रतिस्पर्धी अनुशा कोदितुवाकू दिलरुक्शीवर ठोशांचा मारा केला. ही लढत ९० सेकंदांपेक्षा कमी वेळ चालली. भारतीय खेळाडूला तांत्रिक नॉकआऊटच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले. मेरीच्या जोरकस ठोशांपासून बचाव करताना अनुशाचे संतुलन बिघडले आणि तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय टाईम आऊट घ्यावा लागला. पाच वेळ विश्व विजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मेरीने त्यानंतर जोरकस ठोसा मारीत तिला जवळजवळ रिंगच्या बाहेर केले होते, पण रेफ्रीने लगेच हस्तक्षेप केला. अनुशाला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता
आहे. अनुशाने २००३ च्या
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिने मेरीला कडवे आव्हान देण्याचे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता मेरी कोम म्हणाली,‘‘मला कुणी आव्हान दिले, तर मला चांगले वाटते. लढतीपूर्वी वक्तव्य करीत नाही, पण मानसिकदृष्ट्या सकारात्मक असते. आई झाल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. मी आत्मविश्वास कायम राखण्यासाठी आताही सराव करते.’’ मेरी कोमच्या चमकदार सुरुवातीनंतर इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पूजाराणी देवी हिने ७५ किलो वजन गटात नीलांती आंद्रावीरला नॉकआऊट केले. ही लढत केवळ एका फेरीत आटोपली.
वर्षभराच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या सरिता देवीने श्रीलंकेच्या एम. विदुषिका प्रबाधीविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवला. इंचियोन क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या खेळाडूने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली, पण तिची प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूने तिसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन केले. सरिता दोनदा खाली पडली. अखेर सरिताने या लढतीत ३९-३६ च्या फरकाने विजय मिळवला. भारताने बॉक्सिंगमध्ये सर्व १० सुवर्णपदके पटकावली. यापूर्वी पुरुष विभागात सोमवारी भारताने सात सुवर्णपदके पटकावली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Mary, Sarita's golden punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.