मास्टर ब्लास्टर सचिनच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच

By admin | Published: April 11, 2016 04:39 PM2016-04-11T16:39:14+5:302016-04-11T17:32:07+5:30

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले असून येत्या १४ एप्रिलला चित्रपटाचा टीझरही लाँच होणार आहे.

Master Blaster launches the poster of Sachin's film | मास्टर ब्लास्टर सचिनच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच

मास्टर ब्लास्टर सचिनच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ -  बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक्सची भलतीच चलती असून  ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘नीरजा’, ‘साला खडूस’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आगामी काळातही ‘अझहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘रईस’, ‘दंगल’ यासारखे बायोपिक प्रदर्शित होणार असून त्याच पंक्तीत आता आणखी एक चित्रपट आला आहे.... आणि तो चित्रपट असणार आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित...!
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचे पोस्टर आज लाँच झाले असून येत्या १४ एप्रिलला चित्रपटाचा टीझरही लाँच होणार आहे. खुद्द सचिननेच आज त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर लाँच टाकले आहे.
अझहर चित्रपटात अझहरच्या भूमिकेत इम्रान हश्मी तर  ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या  चित्रपटात धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत करणार आहे. मात्र सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सचिनची भूमिका कोण करेल हे अद्याप गुलदस्त्यातचं आहे.  
दरम्यान शाहरुख खान, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, सुरेश रैना या सेलिब्रिटीजनीही चित्रपटाबद्दल रिट्विट करत उत्सुकता दर्शवली आहे. 
 

Web Title: Master Blaster launches the poster of Sachin's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.