सामना चॅम्पियन्सचा

By admin | Published: May 19, 2017 03:07 AM2017-05-19T03:07:28+5:302017-05-19T03:07:28+5:30

केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील हायव्होल्टेज क्वालिफायर २ चा सामना आज बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना म्हणजे चॅम्पियन्स

Match the Champions | सामना चॅम्पियन्सचा

सामना चॅम्पियन्सचा

Next

- आॅनलाइन लोकमत

केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील हायव्होल्टेज क्वालिफायर २ चा सामना आज बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना म्हणजे चॅम्पियन्स विरुद्ध चॅम्पियन्स असाच राहील.
दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्येही विशेष सामना होईल. आक्रमक गंभीर आणि शांत स्वभावाचा रोहित शर्मा. गंभीरच्या आक्रमकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते. त्याने वेळोवेळी आक्रमकता आणि खेळपट्टीवर संयमाचे प्रदर्शन
दाखवले आहे. तर रोहित शर्मा हा सर्वात गुणवान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात असला. तर स्लिपींग ब्युटी ही त्याची खास ओळखही आहे. रोहितने आपल्या संघाला एकट्याच्या बळावर अनेकवेळा सामने जिंकून दिले आहे. तर दोनदा
मुंबईला आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले.
गौतम गंभीरने केकेआरला आपल्या बळावर अनेकदा सामने जिंकून दिले आहे. त्याची बॅट चालायला लागली की प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा घाम निघतो. त्याने या सत्रात संघाच्या रणनितीत अनेक बदल केले आहेत. त्याचा देखील फायदा केकेआरला झाला.
बिग बॅशमधील संघ मेलबर्न रेनेगड्स्च्या पावलावर पाऊल टाकत गौतम गंभीर याने सुनिल नरेन आणि ख्रिस लीन यांना फलंदाजीला पाठवले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गौतम गंभीरने आपले सलामीचे स्थानही सोडले.
केकेआरसमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते मुंबईच्या अफलातून गोलंदाजीचे.
डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह, मॅक्लेघन, कर्ण शर्मा, हरभजन, मलिंगा यांचे गोलंदाजीचे मिश्रण अफलातून आहे.
तर मुंबईला देखील कुल्टर नाईल, ग्रॅण्डहोम, उमेश यादव, कुलदीप यांच्या भेदक माऱ्याला सामोरे जावे लागेल.
केकेआरचे संघ व्यवस्थापन जखमी मनिष पांडे ऐवजी कुणाला संधी देते हे पाहणे रंजक ठरेल. गेल्या सामन्यात इशांक जग्गीला संधी मिळाली होती. मुंबईच्या संघात नितीश राणा की अंबाती रायडू यापैकी एकाला संधी मिळेल. मुंबईच्या फलंदाजांना मात्र या सामन्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल.
या सामन्यातील विजेता संघ पुण्यासोबत अंतिम फेरीत लढणार आहे. त्यातील १५ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यातील विजेता संघ पुण्यासोबत अंतिम फेरीत लढणार आहे.

Web Title: Match the Champions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.