धोनीची पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

By admin | Published: June 24, 2016 01:12 AM2016-06-24T01:12:11+5:302016-06-24T01:12:11+5:30

टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात नेतृत्व करीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याबाबत

Match with Dhoni's Ponting record | धोनीची पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

धोनीची पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

Next

हरारे : टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने बुधवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात नेतृत्व करीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याबाबत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. रिकी पाँटिंगने ३२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. धोनीनेदेखील तिक्याच लढतीत भारताचे नेतृत्व केले आहे. (वृत्तसंस्था)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये पाँटिंग आणि धोनीनंतर स्टीफन फ्लेमिंग ३०३, द. आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ २८६, आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅलन बॉर्डर २७१, लंकेचा अर्जुन रणतुंगा २४९ आणि भारताचा मोहम्मद अझहरुद्दीन २२१ आणि सौरभ गांगुली १९६ यांचा क्रम लागतो.

२००७ साली भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या धोनीने कारकिर्दीत ६० कसोटी, १९४ वन डे, तसेच
७० टी-२० सामन्यांत कर्णधारपद भूषविले.
नऊ वर्षे नेतृत्व करीत असलेल्या माहीला भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार मानले जाते. त्याने स्वत:च्या नेतृत्वात देशाला २७ कसोटी, १०७ वन डे आणि ४० टी-२० विजय मिळवून दिले आहेत.
धोनीच्या नेतृत्वात देशाने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा वन डे विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स चषक जिंकला होता. याशिवाय स्वत:च्या नेतृत्वात धोनीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानदेखील मिळवून दिले होते.

Web Title: Match with Dhoni's Ponting record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.