क्रिकेट सामना जोड १
By admin | Published: August 31, 2015 12:24 AM2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
परेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने हेराथच्या साथीने केवळ १५.१ षटकात अर्धशतकी भागीदारी केली. परेराने केवळ ४९ चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ईशांतने ३४ व्या षटकात परेराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मिश्राने कौशलला पायचित केले. चहापानाच्या विश्रांतीनंतर ईशांतने हेराथचा अडथळा दूर करीत कसोटी क्रिकेटमध्ये डावात सातव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी नोंदविण्याची कामगिरी केली. धम्मिका प्रसादला (२७) मिश्राने बाद कर
Next
प ेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने हेराथच्या साथीने केवळ १५.१ षटकात अर्धशतकी भागीदारी केली. परेराने केवळ ४९ चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ईशांतने ३४ व्या षटकात परेराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मिश्राने कौशलला पायचित केले. चहापानाच्या विश्रांतीनंतर ईशांतने हेराथचा अडथळा दूर करीत कसोटी क्रिकेटमध्ये डावात सातव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी नोंदविण्याची कामगिरी केली. धम्मिका प्रसादला (२७) मिश्राने बाद करीत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)