महापौर चषक अ.भा. कबड्डी
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:16+5:302015-02-13T00:38:16+5:30
महापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेला सुरुवात
Next
म ापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेला सुरुवातआरसीएफ, सीआरपीएफची विजयी सलामीनागपूर : मुंबई येथील आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स) आणि दिल्ली येथील सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) संघांनी नागपूर महानगर पालिकेच्यावतीने गुरुवारी चिटणीस पार्कवर सुरू झालेल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. महिला गटात पुण्याच्या जागृती प्रतिष्ठानने आणि कोलकाता येथील द. पूर्व रेल्वे संघांनी देखील आपापल्या सलामी लढती जिंकल्या.१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, संयोजक सुधीर राऊत, शिक्षण सल्लागार समिती अध्यक्ष चेतना टांक, नागपूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गिरीश व्यास, माजी अध्यक्ष मदन रतन उपस्थित होते. त्याआधी महाल येथील हनुमान मंदिरातून खेळाडूंनी आणलेल्या क्रीडाज्योतीद्वारे महापौरांनी स्पर्धेची ज्योत प्रज्वलित केली. मनपाच्या प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा आणि सरस्वती तिवारी हिंदी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संदीप भोयर आणि पौर्णिमा उपरीकर यांनी स्पर्धेत सहभागी पुरुषांच्या ३० आणि महिलांच्या २४ संघातील खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. हंबीरराव मोहिते यांनी केले. क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष हरीश दिकोंडवार यांनी आभार मानले. पुरुष गटात मुंबईच्या आरसीएफने नवी दिल्लीच्या सुपर सेव्हन संघाला २६-२४ गुणांनी नमविले. सुपर सेव्हन संघाने मध्यंतरापर्यंत १७-१३ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. अन्य सामन्यात अनिलकुमार व रामचंद्रच्या उत्कृष्ट चढाईच्या जोरावर दिल्लीच्या सीआरपीएफने मुंबईच्या साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) संघाला ४८-१० अशा गुणफरकाने नमविले. महिला गटात पुण्याच्या जागृती प्रतिष्ठान आणि नोएडा येथील नोएडा महाविद्यालय यांच्यातील लढत चुरशीची झाली. निशूची उत्कृष्ट चढाई आणि रुपालीच्या दमदार पकडच्या बळावर मध्यंतरापर्यंत नोएडा कॉलेजने १९ गुण नोंदविले. जागृती प्रतिष्ठानला १२ गुण नोंदविणेच शक्य झाल्यामुळे नोएडा कॉलेजने ७ गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर जागृती प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी वर्चस्वपूर्ण खेळ करीत संघाला ३०-२९ असा निसटता विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात के. बिश्वासच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर कोलकाता येथील दक्षिण पूर्व रेल्वेने मुंबईच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबला २४-१६ अशा गुणफरकाने नमविले. या लढतीत मध्यंतरापर्यंत गुणसंख्या १७-१० अशी होती. (क्रीडा प्रतिनिधी)