मयूरेशचा मृत्यू : मदतीविषयी क्रीडामंत्र्यांची असंवेदनशीलता
By admin | Published: February 6, 2015 01:35 AM2015-02-06T01:35:31+5:302015-02-06T01:35:31+5:30
आर्थिक मदत देण्याऐवजी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी त्याच्या आई-वडिलांबरोबर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकाराची मदत हवी आहे ते विचारून ठरविणार असल्याचे सांगितले.
पुणे : केरळ येथील राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत समुद्रात बुडून निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयूरेश पवार याच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याऐवजी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी त्याच्या आई-वडिलांबरोबर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकाराची मदत हवी आहे ते विचारून ठरविणार असल्याचे सांगितले.
मंगळवारी सकाळी मयूरेश पवारचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आले. त्याचे पार्थिव अत्यंविधीसाठी सातारा येथील माईण येथे पाठविण्यात आले. नंतर विमातळावर पत्रकारांशी तावडे यांनी संवाद साधला. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारने १ लाख, तर भारतीय आॅलिम्पिक महासंघाने २ लाखांची आर्थिक मदत मयूरेशच्या कुटुंबीयांना जाहीर केली. तथापि, महाराष्ट्र शासन मात्र तातडीच्या मदतीबाबत असंवेदशीलच असल्याचे तावडे यांच्या व्यक्तव्याने स्पष्ट झाले. मयूरेशचे पार्थिव माईण येथे नेल्यानंतर तेथील काही ग्रामस्थांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांकडे अपेक्षा व्यक्त केली.
(क्रीडा प्रतिनिधी)
काही मदत जाहीर करण्याऐवजी लवकरच मयूरेशच्या गावी जाऊन त्याच्या आई-वडिलांची भेट घेणार आहोत आणि त्याच्या नावाने अॅकॅडमी सुरू करण्याची त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे का; कुठली आर्थिक मदत हवी आहे ते विचारून ठरविणार आहोत, असे तावडेंनी सांगितले़