MCA च्या अध्यक्षपदी शरद पवार

By Admin | Published: June 17, 2015 09:17 PM2015-06-17T21:17:47+5:302015-06-17T21:17:47+5:30

तब्बल १७२ मतं मिळवत शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर उपाध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे.

MCA president Sharad Pawar | MCA च्या अध्यक्षपदी शरद पवार

MCA च्या अध्यक्षपदी शरद पवार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - तब्बल १७२ मतं मिळवत शरद पवार  एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
तर उपाध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे. क्रिकेट फर्स्ट या गटाचा या निवडणूकीत धुव्वा उडवत महाडदळकर गट व पवार गटाने बाजी मारली आहे. महाडदळकर गटातील फक्त रवी सावंत वगळता सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. ३२९ सदस्यांपैकी ३२१ सदस्यांनी मतदान केले असून महाडदळकर गटासमोर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या डॉ. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट गटाचे आव्हान होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी मतदान केले. तर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे काँग्रेसनेते नारायण राणे मतदान करू शकले नाहीत. 
 

Web Title: MCA president Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.