पदकासाठी जीव तोडून मेहनत घेऊ - सानिया मिर्झा
By admin | Published: July 16, 2016 09:18 PM2016-07-16T21:18:04+5:302016-07-16T21:18:04+5:30
रिओ ऑॅलिम्पिकसाठी मी पुर्णपणे सज्ज असून पदक मिळवण्यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत घेऊ, असा विश्वास सानिया मिर्झा हिने व्यक्त केला
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 16 - रिओ ऑॅलिम्पिकसाठी मी पुर्णपणे सज्ज असून पदक मिळवण्यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत घेऊ, असा विश्वास जगातील अव्वल महिला दुहेरी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केला. ‘‘यंदा आम्ही अत्यंत सकारात्मक विचाराने सहभागी होत असून आमची टीम सर्वोत्तम आहे,’’ असेही सानिया म्हणाली.
दिल्लीत झालेल्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान सानिया बोलत होती. चार वर्षांपुर्वी लंडन ऑॅलिम्पिकच्यावेळी उद्भ्वलेल्या वादाकडे लक्ष वेधताना सानिया म्हणाली, ‘‘त्यावेळी परिस्थिती खरंच वाईट होती. एक मोठा वाद उफाळल्याने सर्वकाही व्यवस्थित नव्हते. आम्ही योग्य विचाराने सहभाग होऊ शकले नाही. मात्र, यावेळी असे काहीहि नसल्याने प्रत्येकाचे लक्ष्य निश्चित आहे. आत्मविश्वास उंचावला असून स्पर्धेसाठी सर्वश्रेष्ठ जोडी जात असल्याने पदक जिंकण्याचा विश्वास आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘लंडन ऑॅलिम्पिकच्यावेळी मी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी नव्हती. प्रत्येकजण आपल्या मर्जीपणे बोलत होते. त्यामुळेच तेव्हा वाद-विवाद झाले. परंतु, यावेळी मी नंबर वन आहे आणि त्यामुळेच सर्वांसमोर सक्षमपणे माझी बाजू मांडू शकले,’’ असेही सानियाने यावेळी सांगितले.
पार्थना ठोंबरे युवा खेळाडू असून २१ वर्षांच्या या खेळाडूकडून बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का देण्याची अपेक्षा करणे चुकीच आहे. ती ऑॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास जात असून हेच मोठे यश आहे. जेव्हा चार वर्षांनी ती पुन्हा ऑॅलिम्पिकला जाईल तेव्हा तीच्याकडे अनुभव असेल. अशावेळी तुम्ही प्रार्थनाकडून पदकाची अपेक्षा करु शकता.
- सानिया मिर्झा