मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:44 AM2019-07-17T04:44:29+5:302019-07-17T04:44:35+5:30

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे;

 Meerabai is constantly persecuted and afraid of being hurt | मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

Next

नवी दिल्ली : भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकपूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती सतावत असल्याचे तिने सांगितले.
कंबरेच्या दुखापतीमुळे २०१८ मध्ये मीराबाईला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मीराबाईने कंबरेचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.
ही दुखापत भारतीय डॉक्टरांसाठी आव्हान ठरली होती. कारण
त्यांना याचे कारण शोधता आले नव्हते. या दुखापतीमुळे २४ वर्षीय भारतीय खेळाडूला आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपला मुकावे लागले.
मीराबाई म्हणाली, ‘दुखापतीनंतर बरेच काही बदलले. पुन्हा दुखापतग्रस्त झाले तर काय होईल, अशी भीती सतत असते. प्रत्येक वेळी वजन उचलताना आणि प्रत्येक सराव सत्रापूर्वी मला दोनदा विचार करावा लागतो.’ जवळजवळ नऊ महिन्यांनी वेदना कमी झाल्यानंतर मीराबाईने खेळामध्ये यशस्वी पुनरागमन केले. पुनरागमनात तिने थायलंडमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेत ईजीएटी कपमध्ये सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, मीराबाई व प्रशिक्षक विजय शर्मा यांना सरावामध्ये बदल करावा लागला.
मीराबाई म्हणाली, ‘माझी पद्धत बदलली. कारण दुखापत का झाली, याचे कारण आम्हाला कळले नाही. हे कुठल्या व्यायामामुळे झाले की माझ्या तंत्रात काही चूक होती, हे आम्हाला कळले नाही.’
शर्मा म्हणाले, ‘आम्ही सावधगिरी बाळगत आगेकूच करीत आहोत.’ पुनरागमनानंतर मीराबाईची कामगिरी उल्लेखनीय ठरली. एप्रिलमध्ये आशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचे थोड्या फरकाने पदक हुकले. मीराबाईने एकूण १९९ किलो (८६ व ११३ किलो) वजन पेलले होते, पण चीनच्या झेंग रोंगच्या तुलनेत ती पिछाडीवर राहिली. झेंगनेही एवढेच वजन उचलले होते, पण क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये अधिक वजन पेलल्यामुळे चीनच्या खेळाडूला पदक
मिळाले.
मीराबाईने अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
मणिपूरच्या या खेळाडूची नजर आता सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचॅम्पियनशिपवर केंद्रित झाली आहे. २०१७ मध्ये तिने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)
>‘दुखापतीतून सावरल्यानंतर माझी प्रगती समाधानकारक आहे. मी ईजीएटीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही हा मान मिळवला. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.
- मीराबाई चानू

Web Title:  Meerabai is constantly persecuted and afraid of being hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.