मेलबोर्न कसोटी अनिर्णित; आस्ट्रेलियाची विजयी आघाडी

By Admin | Published: December 31, 2014 01:17 AM2014-12-31T01:17:35+5:302014-12-31T01:17:35+5:30

भारताने मंगळवारी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले, तरी यजमान आॅस्ट्रेलिया संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर पुन्हा एकदा हक्क प्रस्थापित करण्यात यश मिळविले.

Melbourne Test Draw Australia's winning lead | मेलबोर्न कसोटी अनिर्णित; आस्ट्रेलियाची विजयी आघाडी

मेलबोर्न कसोटी अनिर्णित; आस्ट्रेलियाची विजयी आघाडी

googlenewsNext

मेलबोर्न : भारताने मंगळवारी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले, तरी यजमान आॅस्ट्रेलिया संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर पुन्हा एकदा हक्क प्रस्थापित करण्यात यश मिळविले.
शॉन मार्शच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारतापुढे ७० षटकांत ३८४ धावा फटकाविण्याचे कडवे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अडचणीत सापडला होता; पण अखेर भारतीय संघ सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. या निकालामुळे भारतीय संघाला यावेळी ‘व्हाईटवॉश’ला सामोरे जावे लागणार नसल्याचे निश्चित झाले. भारताची ६ बाद १७४ अशी अवस्था असताना ४ षटके शिल्लक होती. त्यावेळी उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपविण्यास सहमती दर्शविली. त्यावेळी ६६ षटकांचा खेळ संपला होता आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२४) व रविचंद्रन अश्विन (८) खेळपट्टीवर होते. या जोडीने दडपणाच्या स्थितीत संयमी फलंदाजी करीत ११ षटके खेळून काढली. आॅस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी ही लढत अनिर्णित राखण्याची गरज होती. आॅस्ट्रेलियाने आज सकाळच्या सत्रात फलंदाजी करीत भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळविल्या.

धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ५३०. भारत पहिला डाव : ४६५.
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर पायचित गो. अश्विन ४०, ख्रिस रॉजर्स त्रि. गो. अश्विन ६९, शेन वॉटसन झे. धोनी गो. ईशांत १७, स्टिव्हन स्मिथ झे. रहाणे गो. उमेश १४, शॉन मार्श धावबाद ९९, जो. बर्न्स झे. धोनी गो. शर्मा ०९, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. उमेश १३, मिशेल जॉन्सन झे. रहाणे गो. शमी १५, रॅन हॅरिस झे. धोनी गो. शमी २१, नॅथन लियोन नाबाद ०१, जोश हेजलवूड नाबाद ००. अवांतर (२०). एकूण ९८ षटकांत ९ बाद ३१८. गोलंदाजी : उमेश २२-३-८९-२, शमी २८-४-९२-२, ईशांत २०-५-४९-२, अश्विन २८-४-७५-२.
भारत दुसरा डाव : मुरली विजय पायचित गो. हेजलवूड ११, शिखर धवन पायचित गो. हॅरिस ००, लोकेश राहुल झे. वॉटसन गो. जॉन्सन ०१, विराट कोहली झे. बर्न्स गो. हॅरिस ५४, अजिंक्य रहाणे झे. मार्श गो. हेजलवूड ४८, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. जॉन्सन २१, महेंद्रसिंग धोनी नाबाद २४, रविचंद्रन अश्विन नाबाद ०८. एकूण ६६ षटकांत ६ बाद १७४. बाद क्रम : १-२, २-५, ३-१९, ४-१०४, ५-१४१, ६-१४२. गोलंदाजी : जॉन्सन १५-३-३८-२, हॅरिस १६-८-३०-२, हेजलवुड १५-३-४०-२, लियोन १२-०-३६-०, वॉटसन ६-१-१४-०, स्मिथ
२-०-१०-०.

 

Web Title: Melbourne Test Draw Australia's winning lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.