संस्मरणीय विजय : धोनी

By Admin | Published: July 22, 2014 12:15 AM2014-07-22T00:15:13+5:302014-07-22T00:15:13+5:30

इंग्लंडविरुद्ध दुस:या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व शेवटच्या दिवशी 95 धावांनी मिळविलेला विजय संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली.

Memorable victory: Dhoni | संस्मरणीय विजय : धोनी

संस्मरणीय विजय : धोनी

googlenewsNext
लंडन : इंग्लंडविरुद्ध दुस:या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व शेवटच्या दिवशी 95 धावांनी मिळविलेला विजय संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. सांघिक कामगिरीच्या जोरावर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विजय मिळविण्यात यश आल्याचे धोनी म्हणाला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘आमच्यासाठी हा संस्मरणीय विजय आहे. आमच्या संघातील अनेक खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नव्हता, पण त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आमची कामगिरी शानदार झाली. यापूर्वी 2क्11 मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. तिस:या दिवसार्पयत सामन्यावर वर्चस्व गाजविणो महत्त्वाचे होते. त्यानंतर आमच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजविण्याची संधी होती.’ 
ईशांत शर्माने सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी चमकदार कामगिरी केली. त्याने 74 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेत कारकीर्दीतील सवरेत्तम कामगिरी केली. त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूवर बळी घेतले. त्याला आखुड टप्प्याचा मारा करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली धोनीने यावेळी दिली. 
धोनी पुढे म्हणाला,‘पहिल्या सत्रत सवरेत्तम कामगिरी करणो आवश्यक असल्याची प्रचिती आली. अशा वेळी तुम्हाला स्वत:च्या कामगिरीबाबतच शंका येते. उपाहाराच्या अखेरच्या षटकार्पयत ईशांत आखुड टप्प्याचा मारा करण्यास इच्छुक नव्हता. मी त्याला शॉर्ट पिच मारा करण्यास सांगितले. त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली.’
 
विजयाचे श्रेय भारताला!
‘‘ हा दारुण पराभव आहे. विजयाचे श्रेय भारताला द्यायला हवे. त्यांनी आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजीत भूईसपाट केले. ही खेळपट्टी टर्न घेत होती आणि चेंडूत उसळीदेखील होती. त्याचा भारताने अलगद लाभ उचलला.  संघात अनुभवी खेळाडू लौकिकानुसार खेळत नाहीत. दुसरीकडे युवा खेळाडूंनी चांगला खेळ केला. स्वत:मध्ये आत्मविश्वास प्राप्त करण्याची खरी गरज आहे.
- अॅलिस्टर कूक, कर्णधार इंग्लंड.
 
बिन्नी ठरला भाग्यवान!
रॉजर बिन्नीने लॉर्डस् कसोटीत खास कामगिरी केली नाही पण वडील रॉजर बिन्नीसारखीच त्याची उपस्थिती भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारी ठरली. 1986 साली याच लॉर्डस्वर भारताने जो एकमेव विजय मिळविला त्या सामन्यात 
रॉजर बिन्नी खेळले होते. त्या सामन्यात रॉजर बिन्नीच्या वाटय़ाला 55 धावांत तीन आणि 44 धावांत एक असे चार बळी आले होते.’
 
 
 
कर्णधाराच्या विश्वासाचे फळ आहे : ईशांत
लंडन : भारताला क्रिकेटच्या पंढरीत जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर 28 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणा:या ईशांत शर्माने येथील खेळपट्टी माङयासाठी नव्हे तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. उपहारापूर्वीच्या षटकात मी बाउन्सर टाकण्यास तयार नव्हतो, पण धोनीने मी उंच असल्याने मला बाउन्सरच टाकण्यास सांगितले. त्याचा फायदा झाला आणि त्या षटकात मोईनचा बळी मिळाला. हा सामन्याचा टर्निग पॉईंट ठरला. कर्णधाराने माङयावर विश्वास ठेवल्याचे हे फळ आहे, असेही 6 फूट 4 इंच उंचीच्या इशांतने सांगितले
ईशांतने दुस:या डावात 23 षटकांत 74 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेतले. आज बाद झालेल्या 6 फलंदाजांपैकी 5 फलंदाजांना ईशांतने माघारी परतवले. शानदार कामगिरी करणा:या ईशांतला लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’वर स्थान मिळणार आहे. 
ईशांत म्हणाला,‘पहिल्या डावात अजिंक्य रहाणोने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे आम्हाला लय गवसली. विजय, जडेजा आणि भुवनेश्वर यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली. कर्णधार म्हणून धोनी नेहमी खेळाडूंना प्रोत्साहित करतो. माङयामते हे सर्व बळी माङया नावावर असले तरी कर्णधारने घेतलेले आहेत. ’

 

Web Title: Memorable victory: Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.