आॅलिम्पिक संघातून मेस्सीला वगळले

By admin | Published: June 25, 2016 02:44 AM2016-06-25T02:44:08+5:302016-06-25T02:44:08+5:30

आॅगस्टमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकसाठी घोषित करण्यात आलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघात स्टार खेळाडू आणि आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या लियोनेल मेस्सी याचा समावेश करण्यात आलेला नाही.

Messi dropped out of the Olympic team | आॅलिम्पिक संघातून मेस्सीला वगळले

आॅलिम्पिक संघातून मेस्सीला वगळले

Next

ब्युनस आयर्स : आॅगस्टमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकसाठी घोषित करण्यात आलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघात स्टार खेळाडू आणि आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या लियोनेल मेस्सी याचा समावेश करण्यात आलेला नाही.
अर्र्जेंंटिनाचे प्रशिक्षक गेर्राडो मार्टिनो यांनी रियो आॅलिम्पिकसाठी ज्या २२ सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. त्यात मेस्सीचे नाव नाही. आॅलिम्पिक संघात मेस्सीची निवड न करण्याचा आश्चर्यकारक निर्णय आहे. कारण सगळ्यांनाच मेस्सीला निवडले जाण्याची आशा होती.
मेस्सी कोपा अमेरिका चषकात सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत पाच गोल केले. पाचवेळच्या वर्ल्ड फुटबॉलर आॅफ द ईअर मेस्सीने ५५ वा आंतरराष्ट्रीय गोल करून अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला.
मेस्सीने २००८ च्या बिजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्याने कोपा अमेरिका चषकात गॅब्रिएल बतिस्तुताचा विक्रम मोडला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi dropped out of the Olympic team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.