मेस्सी एफसी बार्सिलोना सोडणार?
By admin | Published: November 16, 2016 12:14 AM2016-11-16T00:14:31+5:302016-11-16T00:14:31+5:30
स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा करार २०१८ साली संपुष्टात येणार असून आतापासूनच त्याच्या बार्सिलोना एफसी सोडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा करार २०१८ साली संपुष्टात येणार असून आतापासूनच त्याच्या बार्सिलोना एफसी सोडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, याबाबत मेस्सीने कोणतेही अधिकृत वक्तव्य न करताना न बोलणेच पसंद केले आहे.
एका क्रीडा वृत्तपत्रानुसार, मेस्सीने आधीच आपला करार न वाढवण्याबाबत बार्सिलोना एफसीला कळविले आहे. यानंतर मेस्सीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच याबाबत कोणती टाळटाळही केली नाही. मेस्सीच्या प्रतिनिधीने सांगितले की, ‘याविषयी मेस्सी कोणतीही प्रतिक्रीया देणार नाही.’
विशेष म्हणजे, या क्रीडा वृत्तपत्राने दावा केला आहे की, मेस्सीने आपल्या निर्णयाविषयी बार्सिलोना एफसीला जुलैमध्येच कळविले आहे. तसेच, स्पेनमध्ये मेस्सी आणि त्याच्या वडिलांना कर चुकवेगिरीप्रकरणी कर अधिकाऱ्यांनी दोषी ठरविले होते. त्यामुळेच मेस्सीच्या निर्णयामध्ये या प्रकरणाची मोठी भूमिका असल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मेस्सी आजारी पडला...
विश्वचषक पात्रता फेरी सामन्यासाठी अर्जेंटिनाला जात असताना ब्यूनस आयर्स ते सेन युआन या विमानप्रवासादरम्यान मेस्सी आजारी पडला. या शहराच्या प्रवासादरम्यान मेस्सीसह त्याच्या राष्ट्रीय संघातील अन्य सहकारी देखील आजारी पडले. यानंतरही कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी मेस्सीसह इतर खेळाडू खेळतील. गेत आठवड्यात ब्राझीलकडून झालेल्या ०-३ दारुण पराभवानंतर हा सामना अर्जेंटिनासाठी महत्त्वाचा आहे.